Sameer Amunekar
सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावात गणेशोत्सवाच्या काळात मशिदीत गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. ही परंपरा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानली जाते.
१९८० च्या दशकात हिंदू बांधवांनी गणपती बसवला होता. त्यावेळी प्रचंड पाऊस झाला आणि मंडळामध्ये बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पाणी गळू लागले. तेव्हा गणपतीच्या मूर्तीला मशिदीत आणून ठेवण्यास सांगितले. तेव्हापासून मशिदीतच गणपतीची स्थापना करण्याचे ठरले.
दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी मशिदीत मूर्ती ठेवली जाते. सकाळपासून गावकरी एकत्र येऊन पूजाअर्चा, आरत्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम करतात.
उत्सवात दोन्ही समाजाचे नागरिक सक्रियपणे सहभागी होतात.
या परंपरेमुळे गावाने संपूर्ण महाराष्ट्रासमोर सामाजिक एकतेचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श ठेवला आहे.
गावातील ज्येष्ठ सांगतात की, "गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. समाजातील वाद, भेदभाव दूर ठेवत उत्सव साजरा करतो.
चार दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. "धर्म हा विभाजनासाठी नसून एकतेसाठी आहे" हा संदेश या परंपरेतून दिला जातो.