Santa Claus: जिंगल बेलच्या धूनवर लहानग्यांना भेटवस्तू देणारा सांता आहे तरी कोण?

Santa Claus Story: तुम्ही सांताला खरोखर पाहिलं आहे का? कोण आहे सांता? टीव्हीवर जसं तो आकाशातून येतो तसं खरंच होत असेल का?
Santa Claus Story: तुम्ही सांताला खरोखर पाहिलं आहे का? कोण आहे सांता? टीव्हीवर जसं तो आकाशातून येतो तसं खरंच होत असेल का?
Who is Santa ClausDainik Gomantak
Published on
Updated on

Santa Claus Story and History Explained in Marathi

ख्रिसमस किंवा नाताळ म्हणजे सर्वांचा आवडता सण. सण कुठलाही असला तरीही आपण त्याची भरपूर आतुरतेने वाट बघत असतो. अनेक दिवसांपासून दूर असलेली मंडळी किमान सणाच्या निमित्ताने एकत्र येतात. एकत्र बसून गप्पा होतात, जेवणं होतं आणि एकमेकांमधलं नातं आणखीन पक्क व्हायला मदत मिळते.

सध्या डिसेंबरचा महिना येऊन ठेपला आहे, आणि डिसेंबर म्हटलं की नाताळ आलाच. हा सण वर्षाच्या शेवटी येतो पण आपण मात्र वर्षभर नाताळची वाट पाहत असतो. ख्रिसमस ट्री, डेकोरेशन आणि गिफ्ट्सनी हा सण एकदम बहरून जातो, पण नाताळचं खास आकर्षण तुम्हाला माहितीये का? तो म्हणजे सांता.

आपण रात्री झोपी गेल्यानंतर जो हळूच येतो तो सांता. लाल आणि पांढऱ्या रंगाचा पोशाख घालून, मोठी दाढी असलेला सांता आला म्हणजे आपली इच्छा पूर्ण होणार म्हणून आपण मनोमन खुश होतो. लहानमुलांच्या मनात तर सांता येणार आणि सोबत गिफ्ट्स घेऊन येणार म्हणून एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो.

Santa Claus Story: तुम्ही सांताला खरोखर पाहिलं आहे का? कोण आहे सांता? टीव्हीवर जसं तो आकाशातून येतो तसं खरंच होत असेल का?
Santa Claus: लहानग्यांसाठी गिफ्टचा खजिना घेवून येतोय 'सांता'

पण तुम्ही सांताला खरोखर पाहिलं आहे का? कोण आहे सांता? टीव्हीवर जसं तो आकाशातून येतो तसं खरंच होत असेल का? त्याची एक सुंदर हरणांची गाडी असेल का? आणि तो रात्रीच का येतो बरं?

असं म्हणतात सांताचं खरं नाव संत निकोलस असं आहे. संत निकोलस यांचा जन्म येशूच्या मृत्यूनंतर झाला होता. जन्मापासूनच ते अत्यंत श्रीमंत होते आणि त्यांना कधीही कोणाचं दुःख किंवा कष्ट बघवले नाहीत. लहानपणीच आई आणि वडील दोघेही वारल्याने येशूच त्यांच्यासाठी सर्वस्व होते. निकोलस नेहमी इतरांची मदत करायचे, मात्र त्यांना 'मी तुझी मदत करतोय' हे कोणाला दाखवून द्यायचं नव्हतं आणि म्हणून ते रात्री हळूच जाऊन लोकांच्या इच्छा पूर्ण करून यायचे.

संत नोकोलासबद्दल एक गोष्ट बरीच प्रसिद्ध आहे, असं म्हणतात एका गावात एक गरीब माणूस रहायचा आणि त्याच्या तीन मुली होत्या. मुलींचं लग्न करून देण्यासाठी पुरेसे पैसे त्याच्याजवळ नव्हते आणि म्हणून त्यांना इतरांच्या घरी जाऊन काम करावं लागायचं. एक दिवशी निकोलास यांनी ही गोष्ट समजली आणि त्यांनी एका रात्री हळूच त्या गरीब माणसाच्या घरात घुसून पायमोज्यात काही सोन्याची नाणी ठेवली आणि निघून गेला. तेव्हापासून ते आतापर्यंत आपण निकोलस यांना सांता क्लॉस म्हणून ओळखतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com