Akshata Chhatre
आता काही दिवसांतच हे जुनं वर्ष संपेल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल.
पण त्याआधी येणार आहे नाताळचा सण. थंडगार वातावरणात आपल्याला भेट द्यायला येईल सांता.
तुम्हाला सुद्धा सांता आवडतो का? सांता माझ्यासाठी काय घेऊन येईल म्हणून तुम्ही सुद्धा उत्साही असता?
लहानपणाची हीच मजा असते, सांताने आणलेला चॉकलेट्स सुद्धा आपल्याला खूप आवडतात.
कार्टूनमध्ये दाखवल्यासारख्या सांता खरंच आकाशातून पांढऱ्या हरणांच्या गाडीत बसून येत असेल का?
हे असे प्रश्न आपल्याला लहानपणी अनेकवेळा पडतात,मग आपण मोठे होतो आणि सांता गायब होतो. कायमचा..