'या' आजोबांनी केला Guinness World Record; जाणून घ्या

जगामधील सर्वात वयसकर व्यक्ती म्हणून प्यूट्रो रिको (Puerto Rico) येथे राहणाऱ्या व्यक्तीची नोंद झाली आहे. एमिलियो प्लोर्स मार्केझ (Emilio Flores Marquez) अस या व्यक्तीचं नाव आहे.
Emilio Flores Marquez enters Guinness World Record
Emilio Flores Marquez enters Guinness World RecordCanva
Published on
Updated on

जगामधील सर्वात वयसकर व्यक्ती म्हणून प्यूट्रो रिको (Puerto Rico) येथे राहणाऱ्या व्यक्तीची नोंद झाली आहे. एमिलियो प्लोर्स मार्केझ (Emilio Flores Marquez) अस या व्यक्तीचं नाव आहे. मर्केझ यांचं सध्या वय 122 वर्ष 326 दिवस आहे. गिनिज वर्ल रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून त्यांची निवड झाली आहे. बुधवारी मर्केझ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. 1908 मध्ये मार्केझ यांचा जन्म पोप्यूट्रो रिकानची राजधानी कॅरोलिना (Carolina) येथे झाला होता.

मर्केझ यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर मुलाखतीदरम्यान म्हणाले, माझ्या आई वडिलांनी मला प्रेमाने वाढवले आणि प्रत्येक व्य्क्तींवर प्रेम करण्यास शिकवले. त्यांनी मला आणि माझ्या भावांना आणि बहिणींना चांगले कार्य करण्यास सांगितले होते. आणि असेही म्हटले होते की, देवाचा अंश आपल्यात नेहमीच जीवंत असतो.

Emilio Flores Marquez enters Guinness World Record
China: "याद राखा डोकं ठेचू" शी जिनपिंग यांची अन्य राष्ट्रांना धमकी

मर्केझ यांनी आपल्या 11 भांवडांमधील दुसरा मोठा भाऊ यांच्याबरोबर ऊस शेतात आपल्या कुटुंबासाठी काम केले आणि फक्त तीन वर्षे शाळेत शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी पत्नी एड्रीया प्रेज डी प्लोर्स (Adria Prez de Plors) यांचा 2010 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केझ यांच्या आगोदर रोमेनियाच्या डुमित्रू कोमेनेस्कुने सर्वात वयस्कर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. परंतु 27 जून 2020 रोजी त्यांचे वयाच्या 111 वर्षे 219 दिवसांनी त्यांचे निधन झाले होते. त्यांनतर मार्केझने यांच्या नावावर हा नवा विक्रम नोंदवला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com