भारत संघर्षानंतर Xi Jinping पहिल्यांदाच तिब्बत मध्ये दाखल; सीमाभागाचा केला दौरा

2011 साली जिंनपिंग यांनी चीनी सत्ता मिळवल्यानंतरचा तिब्बत (Tibet) दौरा हा पहिला असल्याने खास आहे.
President of China Xi Jinping
President of China Xi Jinping Dainik Gomantak
Published on
Updated on

शी जिनपिंग यांनी तिबेटला भेट दिली: चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) (शी जिनपिंग) भारताशी (India) सुरु असलेल्या सीमा संघर्षाच्या दरम्यान अरुणाचल प्रदेश च्या लगत असणाऱ्या तिब्बतचा दौरा केला आहे. न्यिंगची शहर सीमावर्ती असल्याने हे रणनिती आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. यासंबंधीची अधिकारिक माहिती चीन च्या सरकारी माध्यमाने दिली आहे. चीन सरकारच्या मालकीची वृत्तसंस्था शिन्हुआ के अनुसार, बुधवारी न्यिंगची मेनलॅंड एअरपोर्टवर शी आले होते. दरम्यान न्यिंगचीचे नागरिक आणि अधिकाऱ्यांनी जिंनपिंग यांचे आदरातिथ्य स्वागत केले. असल्याचं सांगण्यात येत आहे की, 2011 साली जिंनपिंग यांनी चीनी सत्ता मिळवल्यानंतरचा तिब्बत (Tibet) दौरा हा पहिला असल्याने खास आहे.

यानंतर शी यांनी ब्रह्मपुत्र नदी बेसिनमध्ये परिस्थितीक संरक्षणाचं निरिक्षण करण्यासाठी न्यांग नदीचा दौरा केला. यास तिब्बती भाषेत यारलुंग जांग्बो म्हणतात. न्यिंगची हे तिब्बतमधील एक महत्वाचे शहर आहे. जे भारतीय सीमेलगत असणाऱ्या अरुणाचल प्रदेश राज्याच्या सीमेजवळ आहे. चीन सतत अरुणाचल प्रदेशवर आपला दावा करत अएसतो. तर त्यास दक्षिणी तिब्बतचा भाग असल्याचेही सांगत असतो. मात्र दुसरीकडे भारत चीनचा हा दावा स्पष्टपणे नाकारत आला आहे. भारत आणि चीन यांच्यात 3488 किलोमीटरची सीमा आहे.

President of China Xi Jinping
China: 3 वर्षावरील मुलांचं होणार लसीकरण; 'करोनाव्हॅक' लसीला दिली मंजूरी

तीब्बतमध्ये बुलेट ट्रेनचा शुभारंभ

चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे नेते तीब्बत चा दौरा करत असतात. मात्र कम्युनिस्ट पक्षाचे आणि सेंट्रल मिलिट्री कमीशनचे अध्यक्ष शी जिनपिंग मागील अनेक वर्षामधील त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. याआगोदर न्यिंगची शहरात तिब्बतमधील पहिली बुलेट ट्रेन सुरु करण्यात आल्यामुळे चर्चेत आले होते. ही बुलेट ट्रेन तिब्बत प्रांताची राजधानी ल्हासा ते न्यिंगची या दोन शहरांना जोडते. बुलेट ट्रेनचा वेग हा ताशी 160 किलोमीटर आहे. आणि 435.5 किमी इतका भाग व्यापला आहे. ट्रेन विजेवर चालते.

President of China Xi Jinping
China: झिनजियांगमधील लोकसंख्या 48 टक्यांनी घटली; उइगर मुस्लिमांवर अत्याचारात वाढ  

सामरिकदृष्ट्या बुलेट ट्रेन महत्त्वाची

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले होते की, बुलेट ट्रेन स्थीरता आणि सुरक्षितता राखण्यामध्ये मदत करते. त्यांचा इशारा हा अरुणाचलप्रदेश राज्यांच्या संबंधित म्हटले होते. चीन आणि भारत यांच्यात युध्दजन्य परिस्थीती निर्माण होईल त्यावेळी बुलेट ट्रेन ही महत्त्वाची भूमिका साकारु शकते. रेल्वे कामांबरोबर रस्तेमार्गाचीही दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यांनी सामरिकदृष्ट्या महत्वाचा हाईवे बनवला आहे. जो मेडोंग काऊंटीला जोडतो. आणि त्याची सीमा अरुणाचल प्रदेशला जवळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com