चीनच्या झिनजियांग प्रांतातील अत्याचाराचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. चीनच्या पश्चिम प्रांतीय झिनजियांगमध्ये 2017 ते 2019 या कालावधीत लोकसंख्येच्या आकडेवारीत ऐतिहासिक घट नोंदली गेली आहे. चीन प्रांतात राहणाऱ्या लाखो उइगर मुस्लिमांवर चीन लगातार अत्याचार करत आहे. त्यांनी या प्रांतात यातना शिबीर सुरु केले आहे. या क्षेत्रामध्ये लोकसंख्या कमी होत आहे तेच या अन्यायाचे उदाहरण आहे. यावर ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजी पॉलिसी इन्स्टिट्यूटने पूर्ण अहवाल दिला आहे.अहवालानुसार, झिनजियांगमध्ये राहणाऱ्या उइगर मुस्लिम, कजाकी आणि इतर अल्पसंख्याक मुस्लिमांची लोकसंख्या 48.74 टक्क्यांनी घटली आहे. यात पळून जाणाऱ्या आणि ठार झालेल्या लोकांचा समावेश आहे. इतकेच नाही तर 2017 आणि 2018 मध्ये जन्म दरही 43.7 टक्क्यांनी कमी झाला आहे. या अलिकडच्या वर्षांत या क्षेत्रात 71 वर्षांत इतकी घट दिसून आली नाही. लोकसंख्येतील ही घट आतापर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या जनगणनेत प्रथमच दिसून आली आहे.
आकडेवारीत अशी घसरण सीरियन गृहयुद्ध, रवांडा आणि कंबोडिया या नरसंहारातही झाली नव्हती. संशोधन आणि अहवाल सह-लेखक नॅथन राउसर म्हणतात ही लोकसंख्येतील घट अभूतपूर्व आहे. यावरून असे दिसते झिनजियांगमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या कमी करण्याची कारवाई केली जात आहे. येथे अधिकारी कशाप्रकारे अंकुश ठेवत आहेत? झिनजियांगमधील जन्म दर कमी करण्याच्या नियोजित मार्गाने चीन गर्भपात, नसबंदी आणि अत्याचार आणि बाळंतपणासाठी दंड यासारख्या उपाययोजना करीत असल्याचे जर्मन संशोधक एडरियन जेंज यांनी गेल्या वर्षी केलेल्या अहवालालाही या अहवालात दुजोरा देण्यात आला आहे. चीन सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित या अहवालावर भाष्य केले नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड सरकारने चीनविरूद्ध मोर्चा बोलला होता. इथल्या संसदेने चीनमधील उइगर मुस्लिमांवरील अत्याचाराविरोधात एकमताने एक ठराव संमत केला होता. एसीटी पार्टी ऑफ न्यूझीलंडने उइगरवरील अत्याचाराच्या संदर्भात हा प्रस्ताव संसदेत मांडला होता. सर्व पक्षांनी या प्रस्तावावर चर्चा केली. नंतर सर्व पक्षांच्या संमतीने प्रस्ताव मंजूर झाला. या प्रस्तावाला उइगर मुस्लिमांवरील अत्याचारांना नरसंहार म्हटले गेले. सत्ताधारी पक्षाशी सल्लामसलत केल्यानंतर नरसंहार हा शब्द काढून टाकण्यात आला. त्याशिवाय हा संपूर्ण ठराव संमत झाला आहे होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.