Xi Jinping: जिनपिंग यांचे 'अध्यक्षपद' जाणार? विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वबदलाची चीनमध्ये रंगली चर्चा

Xi Jinping China Retirement: जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे नियम केंद्रीय समितीची निर्णय प्रक्रिया, भूमिका, समन्वय संस्थांच्या जबाबदाऱ्या या सर्वाला शिस्तबद्ध करतील, असे नमूद करण्यात आले होते.
xi jinping Latest News
xi jinping Latest NewsX
Published on
Updated on

बीजिंग: चीनच्या अध्यक्षपदावर तहहयात विराजमान असलेले शी जिनपिंग गेल्या १२ वर्षांच्या कालावधीमध्ये प्रथमच सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख संस्थांना अधिकार सुपूर्द करू लागल्याचे चित्र आहे. जिनपिंग यांच्याकडून अध्यक्षपद जाणार असल्याची चर्चाही आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये रंगली आहे. सत्ता संक्रमण किंवा सेवानिवृत्ती या दोन्हीपैकी एका पर्यायाची चाचपणी तर जिनपिंग यांच्याकडून होत नाही ना, अशीही चर्चा आहे. २१ मे ते ५ जून या कार्यकाळात जिनपिंग सार्वजनिक जीवनात दिसले नसल्याचेही वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे.

जिनपिंग यांच्या सत्ताबदलाबाबतच्या तर्कवितर्कांची चर्चा ‘शिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेच्या वृत्ताने सुरू झाली आहे. सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावशाली २४ सदस्यीय पॉलिट ब्यूरोने ३० जून रोजीच्या बैठकीत पक्षाच्या संस्थांच्या नवीन नियमांचा आढावा घेतला. जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हे नियम केंद्रीय समितीची निर्णय प्रक्रिया, सल्लागार भूमिका, समन्वय संस्थांच्या जबाबदाऱ्या, कार्यपद्धती या सर्वाला शिस्तबद्ध करतील, असे नमूद करण्यात आले होते.

अशा संस्था महत्त्वाच्या कार्यांवर अधिक प्रभावी नेतृत्व व समन्वय राखतील आणि महत्त्वाच्या कार्यांची योजना, चर्चा व देखरेख यावर लक्ष केंद्रित करतील, असे ‘शिन्हुआ’च्या वृत्तात म्हटले होते. काही वृत्तानुसार तैवान ताब्यात घेण्याची तयारी शी जिनपिंग यांच्याकडून सुरू असून, त्याच्या तयारीसाठी ते सार्वजनिक जीवनातून दूर राहिले असल्याची शक्यता आहे.

‘ब्रिक्स’मध्ये सहभाग नाही

ब्राझिल येथे आयोजित ब्रिक्स शिखर संमेलनात शी जिनपिंग सहभागी झालेले नाहीत. अध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्यांदाच शिखर संमेलनात सहभागी झालेले नाहीत. चीनचे पंतप्रधान ली कियांग ब्रिक्समध्ये चीनचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

xi jinping Latest News
China India Threat: पाकिस्तान नव्हे, भारताचा खरा शत्रू चीन! अमेरिकन गुप्तचर अहवालात धक्कादायत दावा, काय आहे Report? वाचा..

नियमही बदलले

अलीकडच्या महिन्यांत परदेशातील चीनच्या विरोधी समुदायात कम्युनिस्ट पक्षातील सत्तासंघर्षाची चर्चा जोरात सुरू होती. ‘‘पक्ष संस्थांवरील नवीन नियमांमधून जिनपिंग यांच्या निवृत्तीच्या तयारीचा संकेत मिळू शकतो. सत्ताबदलाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा काळ असल्यामुळे या संस्थांना नियमित करण्यासाठी हे नियम तयार केले गेले असावेत,’’ असे चीनमधील एका राजकीय विश्लेषकाने सांगितल्याचा दावा ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने केला आहे. जिनपिंग रोजच्या कारभारात कमी लक्ष देत असून, त्यांचे प्राधान्यक्रमही बदलले असतील, अशी शक्यताही काही जणांनी व्यक्त केली.

xi jinping Latest News
China Population Crisis: 'काम करु नका, मुलं जन्माला घाला...' चीनी सरकारचा फर्मान; लोकसंख्या वाढवण्याचा दिला आदेश

व्यापारयुद्धाचे कारण?

जिनपिंग यांच्या संभाव्य सत्ता हस्तांतरामागे अमेरिकेसोबतचे ‘टेरिफ वॉर’ कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. चीनकडून अमेरिकेत होणाऱ्या ४४० अब्ज डॉलरच्या निर्यातीवर परिणाम झाल्याचे मानले जाते. तसेच चीनच्या अर्थव्यवस्थेची मंदावलेल्या वाढीमुळेही जिनपिंग यांच्याकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अध्यक्षपद जाण्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com