VIDEO: लाईव्ह टेलिकास्ट सुरु असताना महिला अँकरने गिळली माशी; यूजर्स म्हणाले...

Viral Video: सोशल मीडियावर न्यूज अँकरचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान चुकून तिने माशी गिळली.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak

Viral Video: सोशल मीडियावर न्यूज अँकरचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान चुकून तिने माशी गिळली. हा व्हिडिओ बोस्टन 25 न्यूजच्या अँकरचा आहे. स्कायन्यूजच्या रिपोर्टनुसार, महिला अँकर व्हेनेसा वेल्च गेल्या आठवड्यात न्यूजकास्ट होस्ट करत होती. यावेळी त्याच्या पापण्यांवर एक माशी बसली. तिला काही समजण्याआधीच माशी तिच्या पापण्यांवरुन थेट तोंडात गेली. ही संपूर्ण घटना व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये महिला अँकरने माशी गिळली परंतु तिने अँकरिंग थांबवले नाही. काही यूजर्सनी महिला अँकरचे अँकरिंग मध्येच न थांबवल्याबद्दल कौतुक केले. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, "ती महिला खूपच प्रोफेशनल आहे. तिने कोणतीही चुकीची प्रतिक्रिया दिली नाही किंवा तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसला नाही. तिच्या जागी दुसरे कोणी असते तर त्या महिलेने जे केले ते त्याला करता आले नसते.

Viral Video
Israel Against Protest In America: इस्रायलचा निषेध केल्याने अमेरिकेत अटक करण्यात आलेली कोण आहे भारतीय विद्यार्थी?

आणखी एका यूजरने त्या महिला अँकरचे कौतुक केले लिहिले. ही या प्रोपेशनची नैतिकता आहे. चांगले आणि वाईट दोन्ही एकत्र घडते. आणखी एका व्यक्तीने या महिलेचा पगार वाढवला पाहिजे, असे लिहिले. तिने एकदाही डोळे मिचकावले नाहीत.

दुसरीकडे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम आणि एक्सवरील अनेक अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहेत. इन्स्टाग्रामवर एका पेजने शेअर केलेल्या व्हिडिओला अडीच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com