Israel Hmas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्यांच नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर (Gaza) हल्ले करत आहे. तर दुसरीकडे, आतंरराष्ट्रीय स्तरावर इस्त्रायलला मोठ्या विरोध प्रदर्शनाचा सामना करावा लागत आहे. महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेत लोक इस्त्रायलच्या (Israel) विरोधात विरोध प्रदर्शने करत आहेत.
यातच आता, अमेरिकेत (America) इस्रायलविरोधात आंदोलन (Israel Against Protest) करणाऱ्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. हे विद्यार्थी अमेरिकेतील प्रतिष्ठित प्रिन्स्टन विद्यापीठात (Princeton University) शिकतात.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये तामिळनाडूत (Tamil Nadu) जन्मलेली अचिंत्य शिवलिंगन (Achinthya Sivalingam) आहे. तिच्यासोबत हसन सय्यद नावाच्या आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. हे लोक इतर अनेकांसह गाझा पट्टीत पॅलेस्टिनींना लक्ष्य करुन केलेल्या इस्त्रायली हल्ल्यांचा निषेध करत होते. या दोघांना अटक केल्याची माहिती प्रिन्स्टन ॲल्युमनी विकलीच्या रिपोर्टमधून मिळाली आहे.
विद्यापीठाच्या प्रवक्त्या जेनिफर मॉरील यांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून बाहेर काढण्यात आले आहे. याशिवाय, विनापरवानगी विद्यापीठात टेंट उभारुन आंदोलन केल्याचाही या विद्यार्थ्यांवर आरोप आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वसतिगृहात राहण्याची परवानगी असेल. तामिळनाडूची रहिवासी असलेली अचिंत्य शिवलिंगन पब्लिक अफेयर्समध्ये डिग्रीचे शिक्षण घेत आहे. तर सय्यद हसन प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी करत आहेत. एका निवेदनात, विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विद्यार्थ्यांना अनेक वेळा परिसर खाली करण्याची आणि राजकीय आंदोलनापासून दूर राहण्याची चेतावणी देण्यात आली होती.
त्यानंतरही या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरुच ठेवल्याने अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता अचिंत्य आणि हसनच्या अटकेनंतर इतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवले असून तेथून आपले टेंटही हटवले आहेत. विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे, परंतु ते वसतिगृहातच राहतील.
रिपोर्टनुसार, विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर बाहेरील लोकही या निदर्शनात सहभागी झाले होते. अमेरिकेतील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये इस्रायलच्या विरोधात आंदोलने होत आहेत. याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही अमेरिकेवर टीका करत तुम्ही आमच्या विनाशाच्या घोषणा देत आहात, असे म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ( Israel PM Benjamin Netanyahu) अमेरिकनांवर चांगलेच संतापले. अमेरिकन विद्यापीठांमध्ये सुरु असलेल्या इस्त्रायलविरोधी निदर्शनांचा त्यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये जे काही चालले आहे ते भयानक आहे. आम्हाला संपवण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. नेतन्याहू पुढे म्हणाले की, अमेरिकेत जे काही घडत आहे ते 1930 च्या हिटलर राजवटीत जर्मन विद्यापीठांची आठवण करुन देणारे आहे. दुसरीकडे, बायडन सरकारने नेतन्याहू यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे.
एका व्हिडिओ संदेशात नेतन्याहू यांनी आरोप केला की, अमेरिकेत यहूदीविरोधी भावनांनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अमेरिकेच्या कॉलेज कॅम्पसमध्ये जे घडत आहे ते भयानक आहे." ते पुढे म्हणाले की, ''सेमिटिक-विरोधी जमावांनी प्रमुख विद्यापीठे ताब्यात घेतली आहेत. ते इस्रायलच्या नाशाची हाक देत आहेत. त्यांनी ज्यू विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यांनी ज्यू कंपाउंडवरही हल्ला केला. हे 1930 च्या दशकात जर्मन विद्यापीठांमध्ये काय घडले होते याची आठवण करुन देते."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.