Israel VS Spain: इस्रायलविरुद्ध स्पेन उतरला मैदानात, संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात अर्ज दाखल; केला मोठा आरोप
Israel VS Spain WarDainik Gomantak

Israel VS Spain: इस्रायलविरुद्ध स्पेन उतरला मैदानात, संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात अर्ज दाखल; केला मोठा आरोप

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिकच भडकत चालले आहे. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे.
Published on

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिकच भडकत चालले आहे. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. हमासचा नायनाट करण्याची इस्त्रायलने शपथच घेतली आहे. इस्त्रायलने नुकताच हमासशासित राफाह शहरावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्त्रायलला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. मात्र इस्त्रायल आंतरराष्ट्रीय दबावाची पर्वा न करता गाझासह इतर प्रदेशावर हल्ले करतच आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

गाझामध्ये हमासवर इस्रायलकडून सुरु असलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर युरोपीय देश स्पेनने मोठे पाऊल उचलले आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात पक्षकार होण्याची परवानगी मागण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज करणार असल्याचे स्पेनने म्हटले आहे. स्पेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गुरुवारी ही घोषणा केली. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर गाझामध्ये नरसंहार केल्याचा आरोप केला आहे.

Israel VS Spain: इस्रायलविरुद्ध स्पेन उतरला मैदानात, संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात अर्ज दाखल; केला मोठा आरोप
Israel Hamas War: ‘’7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला तेव्हा...’’; ‘ऑल आइज ऑन राफाह’ मोहिमेवर भडकला इस्त्रायल

दक्षिण आफ्रिकेने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सहभागी होणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश आहे. गाझावरील लष्करी कारवाईदरम्यान इस्रायलने नरसंहार कराराचे उल्लंघन केले असून मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मेक्सिको, कोलंबिया, निकाराग्वा, लिबिया आणि पॅलेस्टाईन यांनी आधीच खटल्यात सामील होण्यासाठी अर्ज केला आहे.

Israel VS Spain: इस्रायलविरुद्ध स्पेन उतरला मैदानात, संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात अर्ज दाखल; केला मोठा आरोप
Israel Hamas War: अनेकजण जिवंत जळाले, गाझा नंतर राफाहमध्ये इस्रायली नरसंहार; 24 तासांत 160 जणांचा मृत्यू

न्यायालयाने इस्रायलला दक्षिण गाझामधील राफाह शहरावरील लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत, मात्र इस्रायलने या आदेशाचे पालन केलेले नाही. परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युएल अल्बारेस यांनी माद्रिदमध्ये सांगितले की, “गाझामध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवाईमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. गाझा आणि पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी अशी आमची इच्छा असून त्यासाठी आम्ही न्यायालयात सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी तयार आहोत.

दरम्यान, इस्रायलने आपल्या सैन्याने कोणताही नरसंहार केला नसल्याचे म्हटले. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर ते हमासला चिरडण्यासाठी ऑपरेशन राबवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com