PM Benjamin Netanyahu
PM Benjamin NetanyahuDainik Gomantak

Israel-Hamas War: अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी इस्रायलने घेतला मोठा निर्णय; पण युद्ध चालूच राहणार!

PM Benjamin Netanyahu: इस्रायलने गाझा पट्टीत तैनात असलेल्या हजारो सैनिकांना तात्पुरत्या कालावधीसाठी परत बोलावले आहे.
Published on

Israel-Hamas War: गाझामध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलने मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलने गाझा पट्टीत तैनात असलेल्या हजारो सैनिकांना तात्पुरत्या कालावधीसाठी परत बोलावले आहे. युद्ध सुरु झाल्यापासून इस्रायलची ही सर्वात मोठी घोषणा आहे. गाझामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून इस्रायलमध्ये अत्यावश्यक कामे ठप्प झाली असून याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. अशा परिस्थितीत बेंजामिन नेतन्याहू सरकारने आघाडीच्या काही सैनिकांना बोलावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, इस्रायलच्या निर्णयाचा अर्थ असा नाही की, तो युद्ध थांबवेल किंवा त्याची तीव्रता कमी करेल.

दरम्यान, 2024 मध्येही हे युद्ध वर्षभर सुरु राहू शकते आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे इस्रायलचे म्हणणे आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, आमच्या बाजूने काही सैनिकांना बोलावण्याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्याही प्रकारचा करार करणार आहोत. आर्थिक घडामोडी सुरु ठेवण्यासाठी या लोकांना परत बोलावण्यात येत असून आघाडीवरील युद्धही पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार असल्याचे ते म्हणाले. वर्षभर युद्ध लढायचे आहे, त्यानुसार लष्कराला नियोजन करावे लागेल, असेही ते म्हणाले. हगारी पुढे म्हणाले की, आम्ही काही सैनिकांना माघारी बोलावत आहोत, तर काही सैनिकांना परत गाझामध्ये तैनात केले जाईल. त्यामुळे समतोल राहील आणि युद्धाबरोबरच अर्थव्यवस्थेवरही लक्ष केंद्रित करु.

PM Benjamin Netanyahu
Israel-Hamas War: इस्रायलचा मोठा निर्णय, गाझामध्ये लढणाऱ्या 5 ब्रिगेड परत बोलावल्या; 24 तासांत 150 पॅलेस्टिनींचा मृत्यू

अमेरिकेनेही इस्रायलच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्ही हीच मागणी करत होतो, असे बायडन प्रशासनाने सांगितले. आता उत्तर गाझामधील युद्धाची धग थोडी कमी होईल अशी आशा आहे. एवढेच नाही तर पुढील रणनीतीवर काम केले जाणार असून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन या महिन्यात पुन्हा इस्रायलला भेट देणार आहेत. अमेरिकेचे म्हणणे आहे की, इस्रायलला आपल्या सुरक्षेचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्याने सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना लक्ष्य करु नये. त्याऐवजी, 7 ऑक्टोबरचा हल्ला करणाऱ्या हमासच्या ठिकाणांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे.

PM Benjamin Netanyahu
Israel-Hamas War: ''गाझामध्ये राहणारा प्रत्येकजण दहशतवादी, मी नरकातून सुटले...'', हमासच्या तावडीतून सुटलेल्या मियाचा खुलासा

दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. शनिवारी हा हल्ला करण्यात आला कारण इस्रायली लोक या दिवशी विश्रांती घेतात आणि धार्मिक विधी करतात. अशा स्थितीत हमासने हा भीषण हल्ला केला, ज्यात सुमारे 1200 लोक मारले गेले. याशिवाय, त्याने मोठ्या प्रमाणात लोकांना ओलीसही ठेवले होते. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने भीषण हल्ले सुरु केले आणि आतापर्यंत 20 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार आतापर्यंत 24 लाख लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com