Belgium: लागली रे लॉटरी! या गावातील दीडशेहून अधिक लोक बनले 'करोडपती'!

Belgium: एका गावात राहणाऱ्या 165 लोकांचे नशीब एका रात्रीत उजळले आहे. सगळे मिळून करोडपती झाले. त्यांनी एकत्रितपणे लॉटरीत 1200 कोटींहून अधिक रक्कम जिंकली.
Money
Money Dainik Gomantak
Published on
Updated on

Belgium: एका गावात राहणाऱ्या 165 लोकांचे नशीब एका रात्रीत उजळले आहे. सगळे मिळून करोडपती झाले. त्यांनी एकत्रितपणे लॉटरीत 1200 कोटींहून अधिक रक्कम जिंकली. अशा प्रकारे प्रत्येकाच्या खात्यात सुमारे 7 कोटी 50 लाख रुपये आले आहेत. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर बेल्जियमच्या अँटवर्प प्रांतात असलेल्या या ओल्मेन गावात जल्लोषाचे वातावरण आहे.

डेली मेलनुसार, ओल्मेन गावातील 165 लोकांनी मिळून युरोमिलियन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. त्यासाठी प्रत्येकाने 1308 रुपये दिले होते. मंगळवारी लकी ड्रॉ (Lucky Draw) जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये त्यांना लॉटरी लागली. आता त्यांना 123 दशलक्ष पौंड बक्षीस म्हणून मिळणार आहेत. भारतीय चलनात ही रक्कम 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Money
Free Condoms : या देशात कंडोम आणि गर्भनिरोधक मिळणार फ्री! 'हे' आहे कारण

दरम्यान, ही रक्कम 165 लोकांमध्ये वाटली तर प्रत्येकाच्या खात्यात सुमारे साडेसात कोटी रुपये येतील. असो, लॉटरी काढण्यापूर्वीच बक्षिसाची रक्कम सर्वांमध्ये समान वाटली जाईल, असे गावकऱ्यांनी ठरवले आहे. काही लॉटरी विजेत्यांनी याचे वर्णन 'सर्वोत्तम ख्रिसमस गिफ्ट' असे केले आहे.

तसेच, नॅशनल लॉटरीचे प्रवक्ते जॉक वर्मोरे म्हणाले की, 'गटात अशा प्रकारे बक्षीस जिंकणे ही नवीन गोष्ट नाही. तथापि, 165 लोकांचा हा गट आतापर्यंतचा सर्वात मोठा लॉटरी विजेता आहे.' त्यांनी पुढे सांगितले की, 'आम्हाला 5 ते 6 वेळा लॉटरी जिंकण्याचा मुद्दा पुन्हा सांगावा लागला, कारण लोकांचा (Citizen) विश्वास बसत नव्हता की, त्यांनी एवढी मोठी रक्कम जिंकली आहे.' सध्या तरी विजेत्यांची ओळख उघड झालेली नाही.

Money
Global Condom Market: जगभरात कंडोम मार्केट वधारणार; भारत,चीनमधुन अधिक मागणी

विशेष म्हणजे, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युरोमिलियन्स जॅकपॉट नाही. ब्रिटनमधील एका व्यक्तीने या वर्षी जुलैमध्ये 195 दशलक्ष पौंड (19000 कोटी) बक्षीस जिंकले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com