Idi Amin: मौत का सौदागर! असा हुकूमशहा, ज्याच्यामुळे शेकडो श्रीमंत भारतीयांनी...

Dictator Idi Amine: युगांडाची संपूर्ण अर्थव्यवस्था या श्रीमंत भारतीयांच्या जोरावर चालत असे. सुरुवातीच्या काळात सर्व काही ठीक होते.
Idi Amin
Idi AminDainik Gomantak
Published on
Updated on

Idi Amine hate Indians Expulsion Uganda: 50 ते 60 च्या दशकात युगांडामध्ये भारतीय उद्योगपतींची भरभराट झाली. युगांडाची संपूर्ण अर्थव्यवस्था या श्रीमंत भारतीयांच्या जोरावर चालत असे. सुरुवातीच्या काळात सर्व काही ठीक होते.

मात्र युगांडाची सत्ता अशा सनकी हुकूमशहाच्या हातात गेली, ज्याने युगांडाच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचवला. त्या क्रूर शासकाचे नाव होते इदी अमीन, ज्याला हे अजिबात आवडले नाही की, बाहेरचे लोक म्हणजे भारतीय लोक आपल्या देशात अप्रत्यक्षपणे सत्तेच्या समांतर शक्तिशाली आणि प्रभावशाली असावेत.

अमीनने नरसंहार घडवला

अमीनने केवळ भारतीयांनाच आपल्या देशातून हाकलून दिले नाही, तर भारतीयांना मदत करणाऱ्या कुटुंबांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले. अमीनची राजवट संपुष्टात आल्यानंतर देशात शेकडो ठिकाणी सामूहिक कबरी सापडल्या. त्यामध्ये अनेक मृतदेह पाहून लोकांचा थरकाप उडाला.

Idi Amin
Uganda: नव वर्षाचा जल्लोष सुरु असताना भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

करोडपती हिंदुस्थानी दोन जोड कपडे आणि 5000 रुपये घेऊन पळून गेले

युगांडाचा हा हुकूमशहा इदी अमीन (Idi Amin) याने आपल्या राजवटीत सुमारे 80 हजार भारतीय वंशाच्या लोकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या बाबतीतही असेच झाले.

युगांडातील प्रत्येक कुटुंब, मग ते कितीही प्रभावशाली असले, तरी त्यांना फक्त एक सुटकेस आणि पाच हजार रुपये घेऊन जाण्याची परवानगी होती. विशेष म्हणजे, ही सर्व अशी कुटुंबे होती, ज्यांच्याकडे कोट्यवधी आणि अब्जावधींची मालमत्ता होती, परंतु त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळून जावे लागले.

युगांडामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांची कहाणी

'स्टेट ऑफ ब्लड - द इनसाइड स्टोरी ऑफ इदी अमीन' या प्रसिद्ध पुस्तकानुसार अमीनची सत्ता हिसकावून घेतल्यानंतर तिथे सामूहिक कबर सापडल्या होत्या.

त्यावेळी, युगांडामध्ये (Uganda) ब्रिटीश राजवट होती. वर्णद्वेषी गोर्‍यांना काळ्या आफ्रिकन लोकांना भेटणे आवडत नव्हते, म्हणून त्यांनी भारतीयांसह आशियाई वंशाच्या लोकांना स्थायिक केले. त्यांचे काम ब्रिटीश (British) आणि आफ्रिकेतील लोकांमध्ये संवाद प्रस्थापित करणे हे होते, येथून पुढे गोष्टी बिघडल्या. युगांडाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीयांचा वाईट काळ सुरु झाला.

Idi Amin
Uganda School Fire: युगांडा येथे अंध मुलांच्या शाळेला आग, 11 जणांचा मृत्यू

खेळ कसा बदलला?

युगांडातील मूळ रहिवासी आणि भारतीय यांच्यातील कटुता शिगेला पोहोचली होती, कारण त्यांना वाटले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांची स्थिती गुलामांचीच राहिली आहे. हुकूमशहा इदी अमीनने याचा फायदा घेतला. आपल्या लोकांच्या मनातील असंतोषाला आणि निराशेला आपले शस्त्र बनवून त्याने भारतीयांना देशातून हाकलून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com