यायर लॅपिड होणार इस्रायलचे नवे पंतप्रधान?

इस्रायलमध्ये राजकीय भूकंप झाला आहे.
Yair Lapid
Yair Lapid Dainik Gomantak
Published on
Updated on

इस्रायलमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचे सरकार कोसळले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने निवडणुका होणार आहेत. इस्रायलमधील गेल्या साडेतीन वर्षांतील ही पाचवी सार्वत्रिक निवडणूक आहे. इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार, यायर लॅपिड इस्रायलचे अंतरिम पंतप्रधान होऊ शकतात. लॅपिड यांच्याबद्दल जाणून घेऊया... (Who Is Yair Lapid Who Will Become Israels Next Prime Minister)

यायर लॅपिड पुढील आठवड्यात हंगामी पंतप्रधान होणार आहेत

58 वर्षीय लॅपिड सध्या इस्रायलचे परराष्ट्र मंत्री आहेत. सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत ते हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहतील. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलची संसद पुढील आठवड्यात मतदान करेल ज्यामध्ये लॅपिड पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारतील. इस्त्रायली मीडियाच्या वृत्तानुसार, ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊ शकतात, मात्र तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Yair Lapid
इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष : भारतीय महिलेचा मृतदेह दिल्लीत दाखल

नफ्ताली यांचे सरकार दीड वर्षही टिकले नाही

बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बेनेट आणि लॅपिड यांनी आठ पक्षांची युती केली. युती सरकारबद्दल इस्रायलचे राजकारण पाहणारे हे सरकार फार काळ टिकू शकणार नाही, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात होते. इस्रायलमधील (Israel) सध्याची परिस्थिती पाहता संरक्षण मंत्री बेनी गँट्झ म्हणाले की, 'मला वाटते की सरकारने (Government) गेल्या एका वर्षात खूप चांगले काम केले आहे. देशाला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे ही शरमेची बाब आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com