इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष : भारतीय महिलेचा मृतदेह दिल्लीत दाखल

Mortal remains of Kerala nurse who died in Palestinian rocket strike earlier arrive at Delhi airport
Mortal remains of Kerala nurse who died in Palestinian rocket strike earlier arrive at Delhi airport
Published on
Updated on

पॅलेस्टाईनच्या दहशतवादी संघटना हमासच्या(Hamas) (Israel-Palestine Conflict) रॉकेट हल्ल्याचा बळी पडलेल्या 30 वर्षीय भारतीय नर्स(nurse) सौम्या संतोषचा मृतदेह नवी दिल्ली विमानतळावर(Delhi Airport) पोहोचला आहे. "सौम्याच्या( ) मृतदेहाचे अवशेष घेऊन जाणारे विमान शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास बेन-गुरियन विमानतळावरून रवाना झाले." शनिवारी सकाळी हे विमान दिल्लीला पोहोचेल, असे ट्विट भारतीय दूतावासाने केले आहे.(Mortal remains of Kerala nurse who died in Palestinian rocket strike earlier arrive at Delhi airport) 

दिल्लीचे विमानतळ येथे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि इस्रायलचे उप-राजदूत येडिल्डिया क्लेन उपस्थित होते. आज हे अवशेष दिल्लीहून केरळमधील सौम्या यांच्या मूळ गावी इडुक्की येथे पाठविला जाणार आहे. सौम्या इस्राएलच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या शहर एशकेलॉन येथील एका 80 वर्षीय वृद्ध महिलेची नर्स म्हणून काम करत होती. सोमवारी संध्याकाळी गाझा शहरातून हमासच्या अतिरेक्यांनी एशकेलॉनवर रॉकेट हल्ला केला तेव्हा सौम्या पतीबरोबर व्हिडिओ कॉलवरून बोलत होती. रॉकेट थेट त्याच घरावर पडल्याने सौम्याचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यात एक आजारी वृद्ध महिला जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या सात वर्षांपासून इस्त्राईलमध्ये काम करणार्‍या सौम्याचा एक 9 वर्षाचा मुलगा आहे, जो आपल्या वडिलांसह केरळमध्ये(Kerala ) राहतो.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की  इस्त्रायली एअर डिफेन्स सिस्टम तांत्रिक गडबडीत होती त्यामुळे तांत्रिक बिघाड झाला होता. या किनारी शहराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट्स हल्ला झाल्याने सौम्याचा मृत्यू झाला. शहरावरील रॉकेट हल्ल्याच्या वेळी 25 टक्के नागरिक सुरक्षित क्षेत्राच्या आवाक्याबाहेर गेले होते. या भागात 1960 मध्ये घरे बांधली गेली आहेत, ज्यांना मूलभूत सुरक्षा नाही, असे एश्केलॉनचे नगराध्यक्ष तोमर ग्लॅम यांनी आर्मी रेडिओवरून सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com