'लेडी अल कायदा' म्हणून ओळखली जाणारी पाकिस्तानी नागरिक आफिया सिद्दीकी कोण?

पाकिस्तानची (Pakistan) नागरिक आफिया सिद्दीकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागे दहशतवाद्यांकडून आफियाला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
Afia Siddiqui
Afia SiddiquiDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानची नागरिक आफिया सिद्दीकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागे दहशतवाद्यांकडून आफियाला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. तर अमेरिकेतील टेक्सासमध्ये (Texas) दहशतवाद्यांनी ज्यूंच्या मंदिरावर हल्ला करुन चार जणांना ओलीस ठेवले होते. चार ज्यूंच्या सुटकेच्या बदल्यात आफिया सिद्दीकीची (Aafia Siddiqui) सुटका करण्याची मागणी या दहशतवाद्यांनी केली आहे. आफिया सध्या अमेरिकेच्या (America) तुरुंगात बंद आहे असून अमेरिकन लष्करी अधिकार्‍यांच्या विरोधात कट रचल्याबद्दल आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ले केल्याबद्दल दोषी आहे. न्यूयॉर्कच्या (New York) न्यायालयाने तिला 86 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

लेडी अल कायदा

या आफियाला लेडी अल कायदा (Al Qaeda) म्हणूनही ओळखले जाते. 2018 मध्ये पहिल्यांदा या लेडी अल कायदाचे नाव चर्चेत आले होते, जेव्हा एका अहवालात दावा करण्यात आला होता की, पाकिस्तान (Pakistan) आणि अमेरिका यांच्यातील गुप्त डीलमध्ये अमेरिकेने आफियाला सोडण्याच्या बदल्यात डॉ. शकील अहमदची मागणी केली होती. शकील अहमदमुळे अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन (Osama Bin laden) पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये मारला गेला होता. डॉक्टर शकीलनेच ओसामाची ओळख पटवणारी बनावट मोहीम राबविली केली होती.

Afia Siddiqui
आफिया सिद्दीकीच्या सुटकेसाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी...

आफिया खूप धोकादायक

अफिया ही त्या कुख्यात दहशतवाद्यांपैकी एक आहे, जिने अमेरिकेत दहशत माजवण्याचा कट रचला होता. तुरुंगात असतानाही तिने एफबीआय अधिकाऱ्याच्या हत्येचा कट रचला होता, यावरुन ती किती भयंकर आहे, याचा अंदाज येतो. 2003 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला आफियाचे नाव कळले आणि तिला अफगाणिस्तानात अटक करुन अमेरिकेत आणण्यात आले. आफियाला अमेरिकेत 86 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Afia Siddiqui
अमेरिकेने 86 वर्षांची शिक्षा सुनावलेली पाकिस्तानी डॉक्टर आफिया सिद्दीकी कोण?

आफिया व्यवसायाने न्यूरोसायंटिस्ट

आफिया सिद्दीकी ही पाकिस्तानी नागरिक असून पेशाने न्यूरोसायंटिस्ट आहे. तिने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून न्यूरोसायन्समध्ये पीएचडी केली आहे. एक वेळ अशी आली की, आफिया एफबीआयसाठी मोस्ट वॉन्टेड बनली होती. या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याने तिला लेडी अल कायदा हे नाव देण्यात आले. अनेक दहशतवादी घटना घडवण्यात ती आघाडीवर राहिली.

आफियावर गंभीर आरोप आहेत

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेत राहणारे अमेरिकन गुप्तचर एजंट, सैनिक आणि पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. याशिवाय आफिया 2011 मध्ये मॅगॉट घोटाळ्याची मुख्य सूत्रधारही होती. दहशतीच्या दुनियेत आफियाचे नाव सर्वप्रथम खालिद शेख मोहम्मद हिच्या तोंडून बाहेर पडले बाहेर पडले होते. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने केलेल्या चौकशीत तिने आफियाचा उल्लेख केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com