What is Stealthing: महिलेच्या परवानगीशिवाय प्रोटेक्शन काढणे गुन्हा; बलात्कार प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा; काय आहे स्टेल्थिंग?

What is Stealthing: ब्रिटनमधील ब्रिक्स्टनमध्ये एका तरुणाला बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Court
CourtDainik Gomantak

What is Stealthing: ब्रिटनमधील ब्रिक्स्टनमध्ये एका तरुणाला बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात दोघांमध्ये शारीरिक संबंध महिलेच्या संमतीनेच झाले होते. मात्र न्यायालयात आरोपी दोषी आढळला. न्यायालयाने त्याला चार वर्षे तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. वास्तविक, यामागे कारण स्टेल्थिंग (Stealthing) असल्याचे सांगितले जात आहे. चला तर मग स्टेल्थिंग म्हणजे काय ते जाणून घेऊया...

स्टेल्थिंग म्हणजे काय?

दरम्यान, स्टेल्थिंग हा देखील बलात्कार मानला जातो. याचा अर्थ असा की, जेव्हा दोन लोक प्रोटेक्शन वापरण्याच्या अटीसह लैंगिक संबंध ठेवण्यास सहमती देतात, परंतु जर व्यक्ती प्रोटेक्शनचा वापर करण्याबाबत खोटे बोलत असेल किंवा संभोग करताना दुसऱ्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय ते काढून टाकत असेल, तर त्याला ‘स्टेल्थिंग’ म्हणतात.

Court
Russia Ukraine War: युद्धादरम्यान रशियन उपसंरक्षणमंत्र्यांची तुरुंगात रवानगी; पुतीन यांची धडक कारवाई

काय होते प्रकरण?

मिररमधील वृत्तानुसार, 39 वर्षीय गाई मुकेंदीला महिलेच्या नकळत प्रोटेक्शन काढल्याबद्दल चार वर्षे तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वृत्तानुसार, ब्रिक्सटनमध्ये मुकेंदीने एका महिलेबरोबर प्रोटेक्शन वापरण्याच्या अटीवर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र, मुकेंदीने तिच्या संमतीशिवाय प्रोटेक्शन मध्येच काढून टाकले. या घटनेची माहिती पीडितेने 9 मे रोजी पोलिसांना दिली होती. पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले की, आरोपीने महिला आणि त्याच्यामधील मेसेज चॅट डिलीट केले आहे. यातील काही मेसेजमध्ये तो स्टेल्थिंगबद्दल माफीही मागत होता. विशेष म्हणजे हे पुरावे मुकेंदीला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे ठरले.

Court
Russia Ukraine War: रशियाचं वाढलं टेन्शन; नाटो संघटनेच्या लष्करानं सीमेवर दिली दस्तक; रशियन संरक्षणमंत्री म्हणाले...

इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना डिटेक्टीव्ह कॉन्स्टेबल जॅक अर्ल यांनी सांगितले की, 'या प्रकरणात तपासादरम्यान मुकेंदीने आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे वारंवार सांगितले. परंतु आमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध अशी केस फाईल केली की, ज्युरींच्या मनात याबाबत कोणतीही शंका राहिली नाही.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com