न्यूक्लियर डेटरंट फोर्स म्हणजे काय? राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला इशारा

पाश्चात्य देशांसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियन अण्वस्त्र प्रतिबंधक दलाला (Russian Nuclear Deterrent Force) सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
Russian Nuclear Deterrent Force
Russian Nuclear Deterrent ForceDainik Gomantak
Published on
Updated on

Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ल्याच्या चौथ्या दिवशी आणि पाश्चात्य देशांसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियन अण्वस्त्र प्रतिबंधक दलाला (Russian Nuclear Deterrent Force) सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेने रशियाच्या या भूमिकेवरुन जोरदार टीका केली आहे. रशिया (Russia) उचलत असलेले पाऊल पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. (What Is A Nuclear Deterrent Force)

दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्षांनी संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांना रशियन न्यूक्लियर डेटरंट फोर्सेसना "लढाऊ ड्यूटी" करण्यासाठी सतर्क राहण्याचे सांगितले आहे.

न्यूक्लियर डेटरंट फोर्स म्हणजे काय?

न्यूक्लियर डेटरंट फोर्स म्हणजे अण्वस्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करणारी आणि प्रतिहल्ला करु शकणारी फोर्स. या फोर्सच्या मुळाशी शीतयुद्धाच्या आधीच्या न्यूक्लियर डेटरन्स सिद्धांताची संकल्पना आहे. ज्याचा वापर कोणताही अण्वस्त्र हल्ला रोखण्यासाठी केला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये (Soviet Union) तणाव वाढला तेव्हा त्याला 'शीतयुद्ध' असे नाव देण्यात आले. त्या काळात दोन महासत्तांमध्ये ( The USA and the then Soviet Union) अण्वस्त्रांची निर्मिती करण्यामध्ये स्पर्धा सुरु झाली होती.

Russian Nuclear Deterrent Force
Russia Ukraine War: 'शांतता' चर्चेसाठी युक्रेन तयार

त्याच वेळी, अमेरिकेने न्यूक्लियर डेटरन्स स्ट्रॅटेजी स्वीकारली आहे. अर्थातच सोव्हिएत युनियन किंवा कोणत्याही देशाने अण्वस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर, अमेरिका खूप वेगाने प्रत्युत्तर देईल. आणि विशेष म्हणजे प्रत्युत्तर म्हणून आणखी मोठा हल्ला करेल.

पुतिन यांनी इशारा का दिला?

दरम्यान, आता बदललेल्या परिस्थितीत पुतीन अमेरिकेची तीच रणनीतीचा अवलंबत करत आहेत. जर अमेरिका किंवा नाटो सहयोगी देशांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेवर कठोर निर्बंध लादले किंवा युक्रेनियन सैन्याला मदत करण्याचा प्रयत्न केला तर रशिया अण्वस्त्रांसह प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असेल, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.

Russian Nuclear Deterrent Force
Russia Ukraine War: युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलवली

रशिया आण्विक हल्ला करणार का?

याक्षणी, अमेरिका (America) किंवा नाटो देश रशियाच्या विरोधात प्रथम अण्वस्त्रांचा वापर करतील असं काही नाही. कारण पुतिन यांनी आधीच सांगितले आहे की "आमच्या मार्गात अडथळा आणणार्‍या कोणत्याही देशाला त्यांनी केलेल्या कारवाईला सामोरे जावे लागेल.''

मात्र, रशियानेही यापूर्वी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि उत्तर कोरियाविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर केल्याचे नाकारले आहे. दुसरीकडे मात्र युक्रेनकडे कोणतीही अण्वस्त्रे नाहीत.

Russian Nuclear Deterrent Force
Russia-Ukraine War: युक्रेनमधील गोमंतकीय सुखरूप

तथापि, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA), UN च्या आण्विक वॉचडॉगने सर्व पक्षांना युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पांना धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कारवाईपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. IAEA ने म्हटले आहे की, युक्रेनमध्ये एकूण 15 अणुभट्ट्यांसह चार अणुऊर्जा प्रकल्प आहेत, जे देशाला जवळपास निम्मी वीज पुरवतात.

शिवाय, युक्रेनमधील (Ukraine) परिस्थितीवर जगभरातून गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. IAEAचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी यांनी शनिवारी सर्व देशांना अणु सामग्रीची सुरक्षितता आणि सर्व अणु प्रकल्पांचे सुरक्षित ऑपरेशन धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. कारण कोणत्याही घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com