Russia-Ukraine War: युक्रेनमधील गोमंतकीय सुखरूप

17 जणांनी केला संपर्क: अनिवासी भारतीय आयुक्तांची माहिती
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध परिस्थिती निर्माण झाली असून काही भागात युद्ध सुरू झाले आहे. तेथे असणाऱ्या भारतीय प्रवाशांना ‘वंदे भारत’ योजनेअंतर्गत रोमानिया आणि पोलंडमार्गे भारतात आणण्यात येत आहे. युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी असून ते सर्व सुखरूप आहेत. त्यांनाही रोमानिया किंवा पोलंडमार्गे भारतात आणण्यात येईल, अशी माहिती गोव्याच्या अनिवासी भारतीय व्यवहार विभागाचे अँथनी डिसुझा यांनी दिली आहे.

Russia-Ukraine War
Goa Accident: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच

उच्च शिक्षणाबरोबर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतातील 20 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत. रशियातील ही संख्या यापेक्षाही जास्त आहे. गोव्यातून वैद्यकीय शिक्षण आणि पशुवैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत. यातील 9 विद्यार्थ्यांनी गोव्याच्या अनिवासी भारतीय व्यवहार विभागाला संपर्क केला असून हे सर्व सुखरूप आहेत. सध्या तेथील एअर स्पेस बंद असल्यामुळे त्यांना रोमानिया आणि पोलंडकडे जाण्याचे सांगण्यात आले असून तेथील भारतीय राजदूत कार्यालयांना संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना रोमानिया किंवा पोलंडकडून भारतात आणण्यात येईल. यासाठी भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क करण्यात आल्याची माहिती डिसूझा यांनी दिली.

‘गोमन्तक’शी संवाद साधताना ते म्हणाले, आम्ही या सर्व विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून अन्य गोवेकर संपर्कात असल्यास त्यांनाही आमच्या विभागाशी संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत आणि ते रोमानियाकडे निघाले आहेत. सध्या त्या भागातील तापमान अतिशय थंड असून या विद्यार्थ्यांनी सर्वात महत्वाची आणि मुख्य समस्या आहे ती म्हणजे प्रवासी वाहतूक व्यवस्था. तेथील सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि जी वाहतूक सुरू आहे ती अत्यंत अपुरी असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, यातून लवकरच मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

Russia-Ukraine War
भयभीत होऊन 'त्या' ट्रकचालकाने केली आत्महत्या

युक्रेन व रशियात गोव्यातील अनेक मुले वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. निश्चित आकडा माहिती नाही, पण आम्ही युक्रेनमधील मुलांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तिथल्या नऊ विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही त्यांना रोमानियामार्फत भारतात आणणार आहोत. याबाबत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क केला आहे. शिवाय रशियातील विद्यार्थीही संपर्कात असून ते सुखरूप आहेत.

- नरेंद्र सावईकर, एनआरआय आयुक्त आणि माजी खासदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com