Russia Ukraine War: युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलवली

Russia Ukraine War: युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदी दिल्लीला रवाना, अर्धवट सोडला यूपीचा दौरा
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियातील युद्धावरून अख्खे जग चिंता ग्रस्त झाले असून या युद्धावर लवकरात लवकार तोडगा निघावा आणि हे युद्ध थांबावे यासाठी जगातील प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. आज देशाचे पंतप्रधान उत्तर प्रदेश मधील त्यांच्या वाराणसी मतदारसंघात भाजपच्या 'बूथ विजय संमेलना'ला संबोधित करण्यासाठी गेले होते. मात्र युक्रेन आणि रशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले.

(Prime Minister Narendra Modi will hold a high-level meeting on the Ukraine issue)

तर पंतप्रधान मोदी (PM Modi) दिल्लीत पोहोचताच युक्रेन (Ukraine) आणि रशियातील (Russia) युद्धाच्या (War)पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक (meeting) घेणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून गुरुवारी रशियाने युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर रशियन सैन्य दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत गेले. तर रशियन सैन्याकडून युक्रेनवर चारही बाजूने हल्ला केला जात आहे. इतकेच काय तर युक्रेनची राजधानी कीववर ही कब्जा करण्याची तयारी रशियन सैन्य करत आहे. तर रशियन सैन्याने युक्रेनमधील आणखी एका शहरावर ताबा मिळवला आहे.

PM Narendra Modi
Russia-Ukraine War: युक्रेनची रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका
PM Narendra Modi
रशिया युक्रेनवर करू शकतो 'आण्विक' हल्ला! पुतीनच्या 'या' प्लॅनमुळे जग घाबरले

आतापर्यंत रशियाने युक्रेनच्या ४७१ सैनिकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या एकूण ९७५ सैन्य तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे. तसेच आज रशियाकडून अधिक आक्रमक भूमिका घेतली गेली असून युक्रेनची राजधानी कीव वर रशियाने ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. तर रशियन सैन्याने युक्रेनमधील आणखी एका शहरावर ताबा मिळवला आहे. युक्रेनच्या दक्षिणेकडे असणाऱ्या नोव्हा काखोव्हाका या शहरावर रशियाने ताबा मिळवला. तसेच रशियन सैन्याने खार्किववर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची माहिती ही समोर येत आहे.

दुसरीकडे युक्रेनने रशियाच्या आतापर्यंत ४,३०० सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. तसेच १४६ रणगाडे, २७ विमाने आणि २६ हेलिकॉप्टर पाडल्याचेही युक्रेनने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com