श्रीलंकेत लागू होणार 'साप्ताहिक इंधन कोटा' : ऊर्जामंत्री

पुढील महिन्यापासून श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साप्ताहिक कोटा निश्चित केला जाऊ शकतो.
Fuel
Fuel Dainik Gomantak
Published on
Updated on

पुढील महिन्यापासून श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) पेट्रोल आणि डिझेलचा साप्ताहिक कोटा (Weekly Quota) निश्चित केला जाऊ शकतो. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे पुरेसे इंधन मिळवू न शकलेला श्रीलंका पेट्रोल आणि डिझेलचा साप्ताहिक कोटा निश्चित करण्याच्या विचारांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. (Weekly fuel quota to be implemented in Sri Lanka Energy Minister)

Fuel
तैवान सामुद्रधुनी मुद्यावरुन चीन अमेरिकेत जुंपली

याअंतर्गत ग्राहक पंपावरून ठराविक प्रमाणात इंधन खरेदी करू शकणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. ऊर्जामंत्री कांचन विजयशेखर यांनी रविवारी ट्विट करून याची घोषणा केली आहे.

'साप्ताहिक कोट्याची हमी देण्याशिवाय पर्याय नाही, '

विजयशेखर म्हणाले की, 'आमच्याकडे पेट्रोल पंपांवर ग्राहकांची नोंदणी करण्याशिवाय आणि साप्ताहिक कोट्याची हमी देण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. इंधन पुरवठा सुरळीत होईपर्यंत ही व्यवस्था सुरूच राहील. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही प्रणाली लागू केली जाईल.

पेट्रोल पंपांबाहेर लांबच लांब रांगा

पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने श्रीलंकेतील लोकांना इंधन खरेदीसाठी पेट्रोल पंपांबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत.

Fuel
America: शिकागोच्या गोळीबारात 5 ठार, 16 जखमी

इंधनाच्या तुटवड्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून देशात 10 तास वीज कपात करण्यात आली. अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार इंधन देण्याची ठरावीक यंत्रणा राबवू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com