America: शिकागोच्या गोळीबारात 5 ठार, 16 जखमी

अमेरिकेतील शिकागो येथे शनिवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
Chicago
ChicagoDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील शिकागो (Chicago) येथे शनिवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यामध्ये 16 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, या आठवड्याच्या शेवटी शिकागोमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये 16 जण जखमी झाले आहेत. (America 5 killed 16 injured in Chicago shooting)

Chicago
परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तानात येण्याची परवानगी देण्याबाबत संरक्षणमंत्र्यांनी केले वक्तव्य

महिला वाहनातून जात असताना तिच्यावर हा हल्ला झाला आहे. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करून तेथून पळ काढला आहे. महिलेच्या डोक्यात आणि शरीराच्या अनेक भागांवर गोळ्या लागल्या होत्या. गंभीर अवस्थेत तिला स्ट्रोजर रुग्णालयात नेण्यात आले नंतर मृत घोषित करण्यात आले.

तर दुसरी घटना शनिवारी पहाटे 2:27 वाजता दक्षिण इंडियानाच्या 2800 ब्लॉकमध्ये घडली. येथे एक 34 वर्षीय व्यक्ती गाडीच्या आत जखमी अवस्थेत आढळून आली. त्याला अनेक वेळा गोळ्या घातल्या गेल्या आणि गंभीर अवस्थेत त्याला युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. NBC च्या रिपोर्टनुसार नंतर त्याचा मृत्यू झाला.

एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि तीन जण त्यामध्ये जखमी झाले आहेत. गोळीबाराची ही घटना शनिवारी दुपारी 3.20 च्या सुमारास साउथ डेमनच्या 8600 ब्लॉकमध्ये घडली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार लोक रस्त्यावर होते तेव्हा अज्ञात वाहनात बसलेल्या एका व्यक्तीने गोळीबार केला आणि ज्यामध्ये 23 वर्षीय व्यक्तीला अनेक गोळ्या लागल्या आणि अॅडव्होकेट क्राइस्ट मेडिकल सेंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला.

Chicago
Prophet Row: स्पष्टीकरणाची अपेक्षा नाही, बांगलादेशच्या मत्र्यांचं विधान

आठवड्याच्या शेवटी झालेल्या पहिल्या जीवघेण्या गोळीबारात, दक्षिण जस्टिनच्या 6800 ब्लॉकमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 5:02 वाजता एका 25 वर्षीय व्यक्तीला गोळ्या झाडण्यात आल्या. दुसर्‍या जीवघेण्या गोळीबारात, वेस्ट 18 व्या स्ट्रीटच्या 400 ब्लॉकमध्ये शुक्रवारी रात्री 11:05 च्या सुमारास एका 26 वर्षीय व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com