Amit Shah On India-China Clash: 'काँग्रेसच्या काळातच चीनने भारताची जमीन बळकावली...,' शहांचा घणाघात

India China Face-off: अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना सैनिकांचे कौतुक केले.
Amit Shah
Amit Shah Twitter/ @AHindinews

India China Face-off: अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना सैनिकांचे कौतुक केले. ते म्हणाले, 'भारताची एक इंचही जमीन कोणी ताब्यात घेऊ शकत नाही. 8 डिसेंबरच्या रात्री आणि 9 डिसेंबरच्या सकाळी आपल्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मी कौतुक करतो.' अमित शाह म्हणाले की, '1962 मध्ये काँग्रेसच्या काळात चीनने भारताची जमीन बळकावली होती.'

ते पुढे म्हणाले की, 'आज विरोधकांनी लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास होऊ दिला नाही. त्याचा मी निषेध करतो. यावर संरक्षण मंत्री संसदेत निवेदन देतील, असे संसदीय कामकाज मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.'

Amit Shah
India China Faceoff: तवांग फेसऑफने पुन्हा आठवण करुन दिली... गलवान खोऱ्यातील खूनी झडप!

शहा पुढे म्हणाले की, 'मी प्रश्नोत्तराच्या तासाची यादी पाहिली आणि प्रश्न क्रमांक 5 पाहिल्यानंतर मला काँग्रेसची अस्वस्थता समजली. राजीव गांधी फाउंडेशनचा (RGF) फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अ‍ॅक्ट (FCRA) परवाना रद्द करण्याबाबत प्रश्न होता. जर त्यांनी परवानगी दिली असती तर मी संसदेत उत्तर दिले असते की, राजीव गांधी फाऊंडेशनला 2005-2007 दरम्यान चिनी दूतावासाकडून 1.35 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले होते, जे FCRA नुसार योग्य नव्हते, म्हणून नियमानुसार, गृहखात्याने त्याची नोंदणी रद्द केली होती.'

राजनाथ सिंह यांचे संसदेत वक्तव्य

अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, '9 डिसेंबर 2022 रोजी पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात अतिक्रमण करुन एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र चीनच्या या घुसखोरीला आपल्या सैन्याने योग्य ते उत्तर दिले आहे. या चकमकीत हाणामारी झाली.'

Amit Shah
India China Conflict: अरुणाचलमध्ये भारत अन् चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, अनेक भारतीय जवान जखमी

या घटनेनंतर, तेथील स्थानिक कमांडरने 11 डिसेंबर 2022 रोजी प्रस्थापित व्यवस्थेअंतर्गत आपल्या चिनी समकक्षासोबत प्लॅग मिटींग घेऊन या घटनेवर चर्चा केली. राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, 'मी या सभागृहाला सांगू इच्छितो की, आमच्या एकाही सैनिकाचा मृत्यू झालेला नाही. त्याचबरोबर कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. भारतीय लष्करी (Indian Army) कमांडोंनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुन्हा जैसे थी परिस्थिती निर्माण झाली आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com