काबूलमध्ये पुन्हा मोठा स्फोट; जो बायडेन यांचा अंदाज ठरला खरा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी शनिवारी इशारा दिला होता की, काबुल विमानतळावर (Kabul Airport) आणखी एक दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) येत्या 24 ते 36 तासांमध्ये होण्याची शक्यता आहे.
Kabul Airport
Kabul AirportDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर पुन्हा एकदा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी शनिवारी इशारा दिला होता की काबुल विमानतळावर (Kabul Airport) आणखी एक दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) येत्या 24 ते 36 तासांमध्ये होण्याची शक्यता आहे. बायडेन यांनी याबाबत निवेदन देताना म्हटले होते की, काबूलमधील (Kabul) परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली असून विमानतळावर आणखीन दहशतवादी हल्ल्यांचा धोका आहे. (Joe Biden warns another at attack at Kabul airport)

व्हाईट हाऊसच्या (White House) अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानातून (Afghanistan) लोकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेचे पुढील काही दिवस हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक काळ असणार आहे.

दरम्यान, या हल्ल्याचा एक व्हीडीओ देखील समोर आला आहे. मात्र हा व्हीडीओ कीतपत सत्य आहे याची खात्री होऊ शकलेली नाही. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. तालिबान राजवट स्थापन झाल्यामुळे अनेक अफगाण नागरिक देश सोडून जाऊ लागले आहेत. यातच काबूल विमानतळावर आज मोठा ब्लास्ट झाला आहे. या ब्लास्टमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. या ब्लास्टची पुष्टी पेटांगॉनकडून करण्यात आली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेकडून काबूल एअरपोर्टवर अलर्ट जारी करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com