COVID-19 Variant EG.5.1 in UK: ब्रिटनमध्ये कोरोनाच्या 'एरिस' व्हेरिएंटचा हाहाकार, जाणून घ्या किती धोकादायक आहे?

COVID-19 Variant EG.5.1 in UK: जगभरात कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. कोरोनाचा EG.5.1 हा नवा व्हेरिएंट ब्रिटनमध्ये खूप वेगाने पसरत आहे.
Covid-19
Covid-19Dainik Gomantak
Published on
Updated on

COVID-19 Variant EG.5.1 in UK: जगभरात कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. कोरोनाचा EG.5.1 हा नवा व्हेरिएंट ब्रिटनमध्ये खूप वेगाने पसरत आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला 'Eris' असे नाव दिले आहे. आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट 'एरिस' वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉनपासून आला आहे. त्याचे प्रकरण गेल्या महिन्यात प्रथमच समोर आले होते. यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (UKHSA) ने सांगितले की, 'Eris' हा 7 नवीन कोरोना व्हेरिएंटपैकी एक आहे.

UKHSA नुसार, EG.5.1 (Eris) ला पहिल्यांदा 3 जुलै 2023 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट म्हणून ओळखले गेले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दोन आठवड्यांपूर्वी EG.5.1 व्हेरिएंटचा मागोवा घेणे सुरु केले.

Covid-19
Monkeypox विषाणूने अमेरिका, ब्रिटनमध्ये उडवली खळबळ, जाणून घ्या लक्षणे

डब्ल्यूएचओचे महासंचालक म्हणाले - सतर्कता घ्यावी

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले होते की, 'लोक लस आणि प्री-इन्फेक्शनपेक्षा अधिक सुरक्षित आहेत, परंतु देशांनी त्यांची दक्षता घेणे कमी करु नये.' नवीन व्हेरिएंट किती धोकादायक आहे यावर ते म्हणाले की, नवीन व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. कारण UKHSA च्या नवीन डेटावरुन असे दिसून आले आहे की, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकरणांपैकी एरिसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 14.6 टक्के आहे.

Covid-19
बोरिस जॉन्सन यांची मोठी घोषणा, ब्रिटनमध्ये मास्क घालण्यावरील निर्बंध हटवले !

UKHSA च्या रेस्पिरेटरी डेटामार्ट प्रणालीद्वारे 4,396 नमुन्यांपैकी केवळ 5.4 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली, मागील अहवालातील 4,403 पैकी 3.7 टक्के. UKHSA चे प्रमुख डॉ मेरी रॅमसे यांनी सांगितले की, या आठवड्याच्या अहवालात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com