Watch Video: Titanic Submarine चे अवशेष तर सापडले; पण, मृत प्रवाशांचे काय झाले? महत्त्वाची माहिती आली समोर

Titan Submarine: टायटन पाणबुडीचे अवशेष आज कॅनडातील समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. यामध्ये पाणबुडीच्या 10 टन लहान-मोठ्या तुकड्यांचा समावेश आहे. या तुकड्यांची तपासणी केल्यानंतर स्फोटाचे कारण स्पष्ट होईल.
Titanic Submarine
Titanic Submarine Dainik Gomantak
Published on
Updated on

Presumed human remains and shattered Titanic submersible:

अटलांटिक महासागरात झालेल्या स्फोटानंतर नष्ट झालेल्या टायटॅनिक पाणबुडीचे अवशेष आज किनाऱ्यावर आणण्यात आले. यात पाणबुडीच्या वाकलेल्या शीट मेटलशिवाय अनेक तुटलेले तुकडे आहेत.

कॅनडातील होरायझन सेंट जॉन्स, न्यूफाउंडलँड, येथे आर्क्टिक जहाजातून पाणबुडीचे अवशेष उतरवण्यात आले आहेत.

शोध पथकाला पाणबुडीचे 10 टन तुकडे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. क्रेनच्या साह्याने लॉरीवर उचलण्यापूर्वी हे अवशेष ताडपत्रीने झाकण्यात आले होते.

होरायझन सेंट जॉन्स, न्यूफाउंडलँड, येथे आर्क्टिक जहाजातून पाणबुडीचे अवशेष उतरवताना कर्मचारी.
होरायझन सेंट जॉन्स, न्यूफाउंडलँड, येथे आर्क्टिक जहाजातून पाणबुडीचे अवशेष उतरवताना कर्मचारी.Dainik Gomantak
टायटनच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या घटकांची कारणे समजून घेण्यासाठी आणि अशाच प्रकारच्या घटना पुन्हा कधी घडू नये याची खात्री करण्यासाठी, अद्याप बरेच काम करणे बाकी आहे. आंतरराष्ट्रीय एजन्सींनी समुद्राच्या इतक्या खोलवर जाऊन पुरावे गोळा करण्यात मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
कॅप्टन जेसन न्यूबाउर, तपास प्रमुख
Titanic Submarine
South Korea : रातोरात कमी झाले 5 कोटी लोकांचे वय; कोणी एक वर्षाने तर कोणी दोन वर्षांनी झाले लहान

टायटन पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर 10 दिवसांनी हे अवशेष शोधण्यात यश आले आहे. टायटन पाणबुडीने उत्तर अटलांटिकमध्ये डुबकी मारल्यानंतर ठीक एक तास 45 मिनिटांनी हा विनाशकारी स्फोट झाला. यामुळे पाणबुडीतील सर्व 5 प्रवाशांचा मृत्यू झाला.

मानवी अवशेष सापडले

या शोध मोहिमेदरम्यान पाणबुडीच्या उरलेल्या भागातून मानवी अवशेष सापडले आहेत. असा दावा करण्यात येत आहे.

"युनायटेड स्टेट्सचे वैद्यकीय पथख सापडलेल्या मानवी अवशेषांची चाचणी करणार आहेत. त्यानंतर हे अवशेष कोणाचे आहेत याची खात्री पटेल.

टाटॅनिक जहाजाचे अवशेष पाहाण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीमध्ये ब्रिटीश एक्सप्लोरर हमिश हार्डिंग, फ्रेंच पाणबुडी तज्ञ पॉल-हेन्री नार्गोलेट, पाकिस्तानी-ब्रिटिश उद्योगपती शाहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान आणि ओशनगेट एक्स्पिडिशन्सचे सीईओ स्टॉकटन रश होते.

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेले अब्जाधीश.
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेले अब्जाधीश.Dainik Gomantak

शोध मोहिमेत आतापर्यंत दहा कोटींचा खर्च

या शोधमोहिमेत कॅनडाचे एक गस्ती विमान आणि दोन बोटींचा सहभाग होता. यासोबतच फ्रान्सचे व्हिक्टर 6000 अंडरवॉटर रोबोटही शोधात सहभागी होते.

यूएस कोस्ट गार्डने टायटन पाणबुडी शोध मोहिमेचा खर्च उघड करण्यास नकार दिला आहे. पण वॉशिंग्टन पोस्टने उपलब्ध माहिती आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलाखतींच्या आधारे $1.2 दशलक्ष (रु. 9.8 कोटी) खर्चाचा अंदाज लावला आहे.

नॅशनल असोसिएशन फॉर सर्च अँड रेस्क्यूचे कार्यकारी संचालक ख्रिस बॉयर यांच्या मते, खर्च अनेक लाख डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.

शोध मोहिमेदरम्यान टायटन पाणबुडीचे सुमारे दहा टन अवशेष सापडले आहेत.
शोध मोहिमेदरम्यान टायटन पाणबुडीचे सुमारे दहा टन अवशेष सापडले आहेत.Dainik Gomantak
Titanic Submarine
PM Modi यांना नडणारी पत्रकार होतेय ट्रोल; बायडन सरकार म्हणाले, "आम्ही हे सहन करणार नाही"

कुठे सापडले टायटनचे अवशेष?

टायटॅनिक जहाजाच्या अवशेषापासून 1,600 फूट (500 मीटर) समुद्राच्या तळावर टायटनचे अवशेष सापडले. जे समुद्राच्या पृष्ठभागाच्या खाली दोन मैल (जवळपास चार किलोमीटर) पेक्षा जास्त आणि न्यूफाउंडलँडच्या किनाऱ्यापासून 400 मैलांवर आहे.

यामध्ये दहा टन वजनाच्या टायटन पाणबुडीचा मागील भाग, लँडिंग फ्रेम आणि पुढचा भाग समाविष्ट होता. होरायझन आर्क्टिक नावाच्या जहाजातून खोल समुद्रातील रोबोट पाणबुडीने हे अवशेष शोधून काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com