Watch Video: पोटातले ओठावर! पंजाबमध्ये ड्रोनद्वारे ड्रग्स पुरवठा; पाकिस्तानी अधिकाऱ्याची कबुली

Drugs: भारतीय सुरक्षा दलांनी अलिकडच्या काळात ड्रग्स वाहून नेणारे अनेक ड्रोन खाली पाडले आहेत.
Pakistan Drones Dropping Drugs In Punjab
Pakistan Drones Dropping Drugs In PunjabDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Drones Dropping Drugs In Punjab: पाकिस्तान सरकारमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने कबूल केले आहे की, पाकिस्तानी ड्रोनचा वापर करून अवैध ड्रग्स, बहुतेक हेरॉईनची भारतीय हद्दीत तस्करी करत आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे संरक्षणविषयक विशेष सहाय्यक मलिक मुहम्मद अहमद खान यांनी पाकिस्तानच्या जिओ न्यूजचे पत्रकार हमीद मीर यांच्याशी बोलताना ही टिप्पणी केली.

मीर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर खान यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पाकिस्तानी पत्रकाराने १७ जुलै रोजी असे ट्विट केले, "पंतप्रधानांचे सल्लागार मलिक मुहम्मद अहमद खान यांचा मोठा खुलासा. पाकिस्तान-भारत सीमेजवळील कसूरच्या पूरग्रस्त भागात हेरॉइनची वाहतूक करण्यासाठी तस्कर ड्रोनचा वापर करतात. या पूरग्रस्तांसाठी पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज द्यावे अन्यथा पूरग्रस्तां पीडित तस्करांमध्ये सामील होतील."

मुहम्मद खान यांची कबुली

हामिद मीर यांनी एका व्हिडीओवर ट्विट केले आहे, त्यांनी मुहम्मद खान यांनी प्रश्न केला की, पाकिस्तानातून भारतात ड्रॅग्स तस्करी केली जात आहे. त्याला उत्तर देताना मुहम्मद खान यांनी म्हटले, "हो, हे खरे आहे आणि भयावयही आहे." त्यांनी सांगितले, या स्थितीत अशाच दोन घटनांमध्ये ड्रोन १०-१० किलो हेरोइन वाहणारे ड्रोन्स पकडले आहेत."

Pakistan Drones Dropping Drugs In Punjab
Adnan Ali Sarkar Arrested: एनआयए ला मोठे यश, ISIS शी संबंधित पुण्यातील डॉक्टरला अटक

ड्रग्स तस्करीच्या घटना

अलिकडच्या काळात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोनने टाकलेले २.३५ किलो हेरॉईन जप्त करून तस्करांचा नापाक डाव उधळून लावला.

शोधादरम्यान, बीएसएफच्या जवानांनी सीमेवर कुंपणासमोरील शेतातून पिवळ्या चिकट टेपने गुंडाळलेले 2.35 किलो वजनाचे हेरॉईन असल्याचा संशयित अंमली पदार्थाचे एक पॅकेट जप्त केले.

29 जून रोजी, बीएसएफच्या जवानांनी तरनतारन जिल्ह्यातील खाल्रा या गावातील शेतात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोनने टाकलेले अंदाजे 5.120 किलो संशयित हेरॉईन जप्त केले.

Pakistan Drones Dropping Drugs In Punjab
Philippines Boat Accident: फिलिपाइन्समध्ये बोट उलटल्याने 30 जणांचा मृत्यू

यापूर्वी 24 जून रोजी बीएसएफच्या जवानांनी पंजाबमधील तरनतारन सेक्टरमध्ये भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी ड्रोनला पाडले होते.

22 जून रोजी, पंजाबच्या फाजिल्का येथे बीएसएफने अबोहर सीमेजवळ पाकिस्तानकडून आलेले ड्रोन आणि संशयित अंमली पदार्थांची दोन पाकिटे जप्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com