सत्तेसाठी तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये संघर्ष, गोळीबारात मुल्ला बरादर जखमी

दोहा शांतता चर्चेमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या तालिबानला (Taliban) हक्कानी नेटवर्कच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
Mullah Abdul Ghani Baradar
Mullah Abdul Ghani BaradarDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) अद्याप मात्र सरकार स्थापन केलेले नाही. दोहा शांतता चर्चेमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या तालिबानला हक्कानी नेटवर्कच्या (Haqqani Network) वाढत्या हस्तक्षेपामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तालिबानचे सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार (Mullah Abdul Ghani Baradar) यांना अल्पसंख्यांक समुदायांना या नव्या सरकारमध्ये सामील करुन घ्यायचे आहे. तर दुसरीकडे तालिबानचे उपनेते सिराजुद्दीन (Sirajuddin) आणि त्यांचा अतिरेकी गट हक्कानी नेटवर्कला कोणासोबतही सत्तेची भागीदारी नको आहे.

Mullah Abdul Ghani Baradar
अफगाणिस्तान क्रिकेट कार्यक्रमांबाबत तालिबानचा फर्मान जारी

दरम्यान, या दोन दहशतवादी गटांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर आले असून, ज्यात बरादार जखमी झाले आहेत. पंजशीर ऑब्झर्व्हर आणि NFR च्या अहवालानुसार, या वाढत्या संघर्षामुळे सरकार स्थापनेमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. आणि हेच कारण आहे की, तालिबानने सरकार स्थापनेची घोषणा (Taliban Government) पुढे ढकलली आहे. तालिबान सरकारचे प्रमुख असलेले बरदार यांना या चकमकीमध्ये गोळी लागल्याने त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. हक्कानी नेटवर्कला सरकार मध्ययुगीन काळासारखे हवे आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आधुनिकतचे लवलेष नको आहे. हक्कानी नेटवर्कने दावा केला आहे की, त्याने काबूल जिंकले असून आता अफगाणिस्तानच्या राजधानीवर त्यांचे नियंत्रण आहे.

Mullah Abdul Ghani Baradar
अफगाणिस्तान मुद्द्यावरून चिदंबरम यांनी टोचले UNSCचे कान

ISI चीफ काबूल दौऱ्यावर का आहे?

पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद (Lt Gen Faiz Hameed) सध्या काबूलच्या दौऱ्यावर आहेत. जेणेकरुन तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये समेट घडवून आणून हक्कानी नेटवर्कच्या बाजूने सरकार बनवू शकेल. यापूर्वी पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कचा वापर करुन काबूलमधील भारतीय दूतावासावर किमान दोनदा दहशतवादी हल्ले केले होते. यावरुन हे स्पष्ट होते की, तालिबानवर आता फक्त हक्कानी नेटवर्कच नव्हे तर पाकिस्तानकडूनही दबाव येत आहे.

Mullah Abdul Ghani Baradar
UNSC मध्ये अफगाणिस्तान प्रश्नावर भारताने स्पष्ट केली भूमिका

पाकिस्तान हक्कानी नेटवर्कच्या अधिक जवळ

एकीकडे तालिबान आणि हक्कानी नेटवर्क दोघेही आता काबूल (Kabul) जिंकले असल्याचा दावा करत आहेत. दरम्यान, पाकिस्तान तालिबानच्या तुलनेत हक्कानी नेटवर्कच्या अधिक जवळ असून त्याला आपल्या बाजूने सरकार बनवायचे आहे. जेणेकरुन ते नंतर भारताच्या विरोधात त्याचा वापर करु शकतील. विशेष बाब म्हणजे, अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतल्यानंतर 20 वर्षांपासून सुरु असलेले अफगाण युद्ध अखेर (Afghan War) संपले आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने निर्वासन ऑपरेशन दरम्यान काबूलमध्ये प्रवेश केला आणि देशावर कब्जा केला. आणि त्याच दिवशी तालिबान्यांनी अफगाण सरकार उलथवून टाकले. त्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनींनी देश सोडून पळ काढला. चीन, पाकिस्तान आणि रशियासारखे देश तालिबानच्या आगमनाने आनंदी असल्याचे दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com