Viral Video
Viral VideoDainik Gomantak

Viral Video: उन्हापासून बचावासाठी पठ्ठ्यानं लढवली शक्कल; सोशल मीडियावर देसी जुगाड व्हायरल!

Viral Video: सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका पठ्ठ्याने उन्हाच्या दाहकतेपासून बचावासाठी देसी जुगाड केला.
Published on

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यातल्या छोट्या गोष्टी व्हायरल होतात. कधी मेट्रोमध्ये बॉलिवूड गाण्यावर डान्स करणाऱ्या मुला-मुलींचा व्हिडिओ तर कधी अचानक जंगली प्राणी घरात शिरलेला व्हिडिओ व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका पठ्ठ्याने उन्हाच्या दाहकतेपासून बचावासाठी देसी जुगाड केला.

आधी हा व्हिडिओ पाहा

Viral Video
Viral Video: बोलणार्‍या कावळ्यानंतर आता फुटबॉल खेळणारा कावळा; गोव्यातील व्हिडिओ व्हायरल Watch

देसी जुगाड

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रस्त्याच्या एका बाजूला उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला शेत आहे. त्याला शेतात कामासाठी जायचे आहे, पण दुपारची वेळ असल्याने उन्हाची दाहकता जास्त जाणवत आहे. या उन्हाच्या दाहकतेपासून बचावासाठी त्याने देसी जुगाड केला. त्याने छत्रीला कॉलेज शॅकसारखे अडकवले. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, तो ती छत्री शॅकसारखी पाठिवर घालतो आणि छत्री डोक्याच्या वर दिसत आहे.

Viral Video
Viral Video: 'बिकिनी घातलेल्या फॉरेनरसाठी आणलीय साडी'; सासु - सुनेचा गोव्यातला धम्माल व्हिडिओ

तुम्ही आत्ता पाहिलेला व्हिडिओ @iAKsSaviour नावाच्या अकाउंटवरुन X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बिहारच्या (Bihar) बिगनर्ससाठी नवं नाही.' व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, 'बिहारींशी पंगा घेऊ नका.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com