Haiti Violence: हैतीत उसळला हिंसाचार, तुरुंगातून पळाले 4 हजार कैदी; आणिबाणी लागू

Caribbean Country Haiti Violence: कॅरेबियन देश हैतीमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे.
Caribbean Country Haiti Violence
Caribbean Country Haiti ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

Caribbean Country Haiti Violence: कॅरेबियन देश हैतीमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. रविवारी रात्री येथे एवढे मोठे हिंसक आंदोलन झाले की, तुरुंगाचे कुलूप तो़डून सुमारे चार हजार कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये अनेक खुनी, अपहरणकर्ते आणि गुन्हेगारांचा समावेश आहे. संपूर्ण देशात 72 तासांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आता सरकारने फरार लोकांना अटक करण्याची घोषणा केली आहे. हैतीमध्ये अनेक कुख्यात गॅंग आहेत, ज्या हिंसाचारासाठी जबाबदार आहेत.

दरम्यान, हे हल्लेखोरांनी दुकाने आणि निवासी भागात तोडफोड केली. सरकारी कार्यालयांवर हल्ले केले. हिंसाचाराचादरम्यान एका सशस्त्र टोळीने देशातील दोन मोठ्या तुरुंगांवर हल्ला केला. यानंतर कैदी बाहेर आले आणि पळून गेले. हैतीचे कार्यवाहक पंतप्रधान पॅट्रिक बिव्हर्ट यांनी सांगितले की, 'गुन्हेगारांना पकडण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.' एरियल हेन्री इतर देशांची मदत आणि UN कडून पाठिंबा मिळवण्यासाठी परदेश दौऱ्यावर आहे.

Caribbean Country Haiti Violence
Violence In Haiti: हैतीमध्ये भयानक हिंसाचार, 530 हून अधिक लोकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता

दुसरीकडे, माजी पोलीस अधिकारी जिमी चेरिजियर यांच्या गॅंगला हेन्री यांना सत्तेवरुन हटवायचे आहे. ही गॅंग सरकारी संस्थांवरही हल्ले करुन लोकांच्या मनात सरकारबद्दल (Government) अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे की, तुरुंगावर हल्ला झाला तेव्हा तिथे कोणताही सरकारी कर्मचारी उपस्थित नव्हता. तुरुंगाचे सर्व दरवाजे सताड उघडे असून कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले.

Caribbean Country Haiti Violence
Haiti: हैतीमध्ये बंदुकधारी डाकूंची दहशत, दोन पत्रकारांना गोळ्या घालून जाळले जिवंत

हैती सरकारचे म्हणणे आहे की, पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात अनेक कर्मचारी जखमी झाले. जिमी चेरिजियर यांनी सुरुवातीला सरकारच्या विरोधाचा मार्ग स्वीकारला होता पण नंतर त्यांच्या गॅंगने हिंसाचाराचा अवलंब केला. वृत्तानुसार, हिंसाचारानंतर कैद्यांचे मृतदेह तुरुंगात पडलेले आढळले. गॅंगच्या हल्ल्यात अनेक कैद्यांचा मृत्यूही झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com