''भारतविरोधी कारवायांसाठी अमेरिकन भूमीचा होतोय वापर''; भारतीय वंशाच्या गटाने एफबीआय अधिकाऱ्यांची घेतली भेट

USA Indian Origin People Meet FBI Justice Department: अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांनी एफबीआय आणि न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि पोलिसांची भेट घेतली आहे.
FBI
FBI Dainik Gomantak
Published on
Updated on

USA Indian Origin People Meet FBI Justice Department:

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांनी एफबीआय आणि न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि पोलिसांची भेट घेतली आहे. या बैठकीत भारतीय वंशाच्या लोकांनी अमेरिकेच्या भूमीचा वापर भारताविरोधातील दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याचा आरोप केला. सिलिकॉन व्हॅलीमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना भेटलेल्या भारतीयांच्या टीममध्ये समुदायातील अनेक प्रमुख लोक होते. या लोकांनी अमेरिकेत हिंदू समुदायाच्या लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आणि कारवाईची मागणी केली.

हिंदू आणि जैन समाजाच्या मंदिरांवर हल्ले

दरम्यान, भारतीय टीमचे नेतृत्व समाजाचे नेते अजय जैन भुटोरिया यांनी केले. या बैठकीत अमेरिकेतील हिंदू आणि जैन मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तसेच, कायदेशीर यंत्रणा आरोपींवर कोणतीही कारवाई करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. अमेरिकेत बसून भारतात (India) दहशतवाद पसरवणाऱ्या लोकांवर कायदेशीर यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप भारतीय वंशाच्या लोकांनी केला आहे. या बैठकीला अनेक न्याय विभागाचे अधिकारी तसेच, FBI अधिकारी आणि सॅन फ्रान्सिस्को, मिलपिटास, फ्रेमोंट आणि नेवार्क पोलिसांचे अधिकारी उपस्थित होते.

FBI
UN, America on CAA Act: ''शिया मुस्लिमांना का स्वीकारले नाही...''; अमेरिका, संयुक्त राष्ट्राने सीएएबाबत व्यक्त केली चिंता

समुदायाच्या सदस्यांनी सांगितले की, अलिकडच्या काही महिन्यांत हिंदू आणि जैन समाजाच्या लोकांवर हल्ले वाढले आहेत, ज्यामुळे समुदायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खलिस्तानी लोक भारतीयांच्या शाळा आणि जनरल स्टोअर्सच्या बाहेर वाहने पार्क करुन भारतीय समुदायाला भडकवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप आहे.

FBI
America Crime: अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीवर पुन्हा हल्ला; रेस्टॉरंटबाहेर हाणामारीत मृत्यू

कारवाईची मागणी

सॅन फ्रान्सिस्को येथील वाणिज्य दूतावासातील भारतीय राष्ट्रध्वज फाडल्याप्रकरणी कारवाई होत नसल्याबद्दलही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना खलिस्तानी मुद्द्याबद्दल माहिती नाही आणि समुदयातील लोकांनी आधी त्यांना याबाबत संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरुन फुटीरतावादी गटांबद्दल जागरुकता वाढेल. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे भुतोरिया यांनी सांगितले. गेल्या चार महिन्यांत बे एरियामध्ये 11 हून अधिक हिंदू (Hindu) मंदिरांवर हल्ले झाले आणि मंदिरांच्या भिंतींवर भारतविरोधी गोष्टी लिहिल्या गेल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com