HIV Treatment: ऐतिहासिक! एचआयव्ही संसर्गावर औषध सापडले, अमेरिकेत वापरास मिळाली मान्यता

Medicine On HIV Approved In USA: येजटुगो या ब्रँडच्या नावाखाली लेनाकापाविर औषधाची विक्री केली जाते. औषध एचआयव्ही संसर्गाची धोका ९९.९ टक्के कमी करतो, असा दावा त्यांनी केला आहे.
Medicine On HIV Approved In USA
HIVDainik Gomantak
Published on
Updated on

वैद्यकीय विश्वातून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. आरोग्यसाठी घातक असलेल्या एचआयव्ही संसर्गावर औषध अखेर सापडलं असून, या औषधाला अमेरिकेत मान्यता मिळाली आहे. "लेनाकापाविर" नावाच्या औषधाला अमेरिकेच्या औषध आणि अन्न प्रशासनाच्या वतीने याला मान्यता देण्यात आली आहे. वर्षातून दोनदा हे औषध घेतल्यास एचआयव्हीपासून ९९.९ टक्के संरक्षण देणार आहे.

"एचआयव्हीला दूर ठेवण्यासाठी हे औषध वर्षातून दोनवेळा घ्यावे लागणार आहे. एचआयव्ही विरोधातील लढाईतील ही महत्वाची क्रांती आहे. जगभरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे," असे मत गायलीड सायन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल ओ'डे यांनी व्यक्त केले आहे.

Medicine On HIV Approved In USA
Goa Accident: महाराष्ट्रातून बॉयलर कोंबड्या घेऊन गोव्याला येणाऱ्या जीपचा नानोड्यात अपघात, चालकाची सुखरुप सुटका

येजटुगो या ब्रँडच्या नावाखाली लेनाकापाविर औषधाची विक्री केली जाते. औषध एचआयव्ही संसर्गाची धोका ९९.९ टक्के कमी करतो, असा दावा त्यांनी केला आहे. कंपनीच्या वतीने औषधाची दोनवेळा क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली. पहिल्या ट्रायलमध्ये आफ्रिकेतील २००० महिलांचा समावेश होता.

चाचणीनंतर महिलांमध्ये १०० टक्के सकारात्मक प्रभाव दिसून आल्याचा दावा कंपनीने केला आहे. दुसऱ्या ट्रायलमध्ये २००० पुरुषांचा समावेश होता. यात देखील ९९.९ टक्के रोग प्रतिकार दर दिसून आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, औषधामुळे काही दुष्परिणाम देखील दिसून आले यात डोकेदुखी, सर्दी यासारख्या आजारांचा समावेश होता. या दोन्ही ट्रायलचे निकाल 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. वैज्ञानिक जर्नलमध्ये लेनाकापाविर या औषधाला २०२४ वर्षातील सर्वात मोठे यश मानले जात आहे.

Medicine On HIV Approved In USA
Viral Video: 2025 में क्या देखा...! आतापर्यंतच्या घटनांवर पठ्ठ्यानं बनवलं 'रॅप'; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

औषधाची किंमत किती?

गायलीड कंपनीच्या वतीने या औषधाची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या औषधासाठी वर्षाला २५,००० डॉलर रुपये प्रतिवर्ष मोजावे लागतील. जगभरातील एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यासाठी या किंमतीत कपात करण्याची मागणी केली जात आहे. किंमत अवक्याबाहेर असल्याने अनेक श्रीमंत लोक देखील देखील हे औषध वापरु शकणार नाहीत, असा दावा केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com