डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची करणार घोषणा, ‘Truth Social’ असणार नाव

'आम्ही अशा जगात राहत आहोत जिथे ट्विटरवर तालिबानची उपस्थिती आहे (Taliban on Twitter). मात्र आमचे लोकप्रिय अध्यक्ष शांत आहेत.
USA EX President Donald Trump
USA EX President Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) स्वतःचे सोशल मीडिया अॅप लॉन्च करणार आहेत. ज्याला 'Truth Social' असे नाव देण्यात येणार आहे. याबाबत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 'आम्ही अशा जगात राहत आहोत जिथे ट्विटरवर तालिबानची उपस्थिती आहे (Taliban on Twitter). मात्र आमचे लोकप्रिय अध्यक्ष शांत आहेत.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या Truth Social ची बीटा आवृत्ती नोव्हेंबरमध्ये आमंत्रित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे. समूहाच्या मते, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुप यांच्या (TMTG) मालकीचा असेल. जे डिमांड सेवेवर सबस्क्रिप्शन व्हिडिओ लाँच करु शकते, ज्यात 'नॉन-व्होक' इंरटेनमेंट प्रोग्रामिंग असणार आहेत. फेसबुकपासून ट्विटरपर्यंत जवळजवळ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती. त्यामुळे या प्लॅटफॉर्म्संना शह देण्यासाठी ट्रम्प यांनी या नव्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे.

USA EX President Donald Trump
तालिबान्यांच्या क्रूरतेचा कळस,महिला खेळाडूचा शिरच्छेद

लोकांना भडकवण्याचा आरोप

ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'बिग टेक (Trump on Social Media) च्या अत्याचाराविरोधात उभे राहण्यासाठी मी ट्रुथ सोशल आणि टीएमटीजी तयार केले आहे. आम्ही अशा जगात राहतो जिथे तालिबानची ट्विटर उपस्थिती आहे, तरीही तुमचे आवडते अमेरिकन अध्यक्ष शांत आहेत, आणि हे अस्वीकार्य आहे. फेसबुकपासून ते ट्वीटरपर्यंत या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्संनी ट्रम्प यांच्यावर बंदी घातली आहे. अमेरिकन संसदेची तोडफोड करणाऱ्या जमावाला भडकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तेव्हापासून ते सोशल मीडियावर परतण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.

USA EX President Donald Trump
'आम्ही शांतताप्रिय मात्र...' पाकिस्तानचा भारताला सज्जड दम

ट्रम्प यांनी एक ब्लॉगही लाँच केला

यापूर्वी मे महिन्यात ट्रम्प यांनी 'फ्रॉम द डेस्क ऑफ डोनाल्ड जे ट्रम्प' नावाचा ब्लॉगही सुरु केला होता. ज्याला प्रमुख आउटलेट (Trump Launched Blog) असे करण्यात आले. परंतु त्यानंतर ट्रम्प यांच्यावर इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि स्नॅपचॅटकडून बंदी घालण्यात आली होेती. त्यानंतर त्यांनी एका महिन्यानंतर आपला ब्लॉग बंद केला होता. ट्रम्प यांचे माजी सहाय्यक जेसन मिलर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला गेटर नावाचे एक सामाजिक नेटवर्क देखील सुरु केले आहे. परंतु माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प अद्याप सामील झालेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com