कमला हॅरिस यांनी अमेरिकन नागरिकांना केले द्वेष-हिंसाचार संपविण्याचे आवाहन

अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यानंतर कमला हॅरिस यांनी प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी केली.
US Vice President Kamala Harris
US Vice President Kamala HarrisTwitter
Published on
Updated on

अमेरिकेतील बफेलो सुपरमार्केट (Fuenral) येथे वांशिक हल्ल्यात ठार झालेल्या महिलेवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसही (kamala harris) उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी अमेरिकेतील जनतेला द्वेष आणि हिंसाचार संपवण्याचे भावनिक आवाहन केले. (US Vice President Kamala Harris)

द्वेष आणि हिंसाचाराने देश बरबाद झाला असून त्याविरोधात कठोर कारवाई करावी लागेल, असे त्या म्हणाले. त्यामुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर कमला हॅरिस यांनीही मृतांच्या स्मृतीस्थळांवर जाऊन श्रद्धांजली वाहिली. येथे त्यांनी फुले अर्पण केली आणि काही वेळ शांततेत उभे राहून प्रार्थना केली.

US Vice President Kamala Harris
'मी एक मजनू आहे,' मनी लाँड्रिंग प्रकरणात पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब साक्ष

अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यानंतर कमला हॅरिस यांनी प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, अलीकडेच देशात किमान 200 सामूहिक गोळीबार झाल्या आहेत. आता आपल्या सर्वांना एकत्र उभे राहून ठरवावे लागेल की यापुढे आपल्या देशात असे घडणार नाही.

शस्त्रांवर बंदी घातली पाहिजे

शस्त्रांवर बंदी घातली पाहिजे असे मी अनेकदा सांगितले आहे. प्राणघातक शस्त्रे अनेक मानवांना मारण्याच्या उद्देशाने तयार केली जातात. आपण अशा समाजात राहतो जिथे लोकांच्या भल्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी नियम आणि कायदे बनवले गेले आहेत, असे हॅरीस शोकसभेमध्ये बोलत होत्या.

US Vice President Kamala Harris
बंदूक कायद्याच्या बाजूने अमेरिकन नेत्याने केला अजब युक्तिवाद, म्हणाले- 9/11 हल्ल्यानंतर आम्ही विमानांवर बंदी घातली नाही

देशात 200 हून अधिक सामूहिक हत्या झाल्या आहेत, त्यामुळे आता आपण कठोर पावले उचलून एक राष्ट्र म्हणून एकत्र आले पाहिजे. एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय द्यावा लागेल. 86 वर्षीय रुथ व्हिटफिल्ड यांच्या अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती हॅरीस पोहचल्या तेव्हा त्या बोलत होत्या. रुथ व्हिटफिल्ड 14 नाय येथे तिच्या पतीला भेटल्यानंतर टॉप्स फ्रेंडली मार्केटमध्ये गेली जिथे अंदाधुंद गोळीबार झाला आणि तिची हत्या झाली. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com