'मी एक मजनू आहे,' मनी लाँड्रिंग प्रकरणात पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब साक्ष

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज स्वत: ला "मजनू" म्हणून संबोधले
Pakistan Prime Minister Shahabaz Sharif
Pakistan Prime Minister Shahabaz Sharif Dainik Gomantak

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज स्वत: ला "मजनू" म्हणून संबोधले आहे. त्यांनी आज पाकिस्तानी रुपयाच्या 16 अब्ज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्या आणि त्यांच्या मुलांविरुद्ध विशेष न्यायालयात साक्ष दिली. (Pakistan PM Shehbaz Sharif calls himself 'Majnoo')

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या विरोधात दाखल केलेल्या 16 अब्ज पाकिस्तानी रुपयाच्या मनी लाँडरिंग प्रकरणाबाबत आज एका विशेष न्यायालयात खुलासा केला. पंजाबचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पगारही घेतला नाही आणि त्यांनी असे का केले असे विचारले असता शाहबाज यांनी 'मी एक मजनू आहे म्हणून मी असे केल्याचे' शरीफ यांनी कोर्टाला सांगितले.

शाहबाज आणि त्यांची दोन मुले हमजा आणि सुलेमान यांच्यावर फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) ने नोव्हेंबर 2020 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

Pakistan Prime Minister Shahabaz Sharif
पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका; इम्रान खान यांनी सरकारला घेरले

"मी एक मजनू आहे..."

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांचा मुलगा हमजा हा सध्या पंजाब प्रांताचा मुख्यमंत्री आहे, तर दुसरा मुलगा सुलेमान फरार असून तो ब्रिटनमध्ये राहत आहे. एफआयएने आपल्या तपासात शाहबाज कुटुंबाची 28 कथित बेनामी खाती उघडकीस आणली आहेत ज्याद्वारे 2008 ते 2018 या काळात 14 अब्ज रुपयांची मनी लाँड्रिंग करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान शाहबाज म्हणाले, "मी 12.5 वर्षात सरकारकडून काहीही घेतले नाही आणि या प्रकरणात माझ्यावर 25 लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे." डॉन वृत्तपत्राने त्याचा हवाला देत म्हटले आहे की, "मला अल्लाहने हा देश दिला आणि मला पंतप्रधान केले. मी माझा पगार आणि कायदेशीर हक्काचा कधीच फायदा घेतला नाही. कारण मी एक मजनू (मूर्ख) आहे असे मला वाटते.”

"माझ्या निर्णयामुळे कुटुंबाचे दोन अब्ज रुपयांचे नुकसान झाले"

शाहबाज यांनी न्यायालयाला सांगितले की, “माझ्या निर्णयामुळे माझ्या कुटुंबाचे दोन अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. मी तुम्हाला वास्तव सांगत आहे. माझ्या मुलाचा इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारला जात असतानाही मी इथेनॉलवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे माझ्या कुटुंबाचे वार्षिक 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.” शाहबाजच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, मागील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि दुर्भावनापूर्ण हेतूवर आधारित आहे. विशेष न्यायालयाने 21 मे रोजी गेल्या सुनावणीदरम्यान शाहबाज आणि हमजाचा अंतरिम जामीन 28 मे पर्यंत वाढवल्यानंतर सुलेमानच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला होता.

Pakistan Prime Minister Shahabaz Sharif
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांच्यासोबत करणार चर्चा

शाहबाज 1997 मध्ये पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांचे बंधू नवाझ शरीफ देशाचे पंतप्रधान होते. 1999 मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ सरकार उलथून टाकल्यानंतर, 2007 मध्ये पाकिस्तानात परतण्यापूर्वी शाहबाज यांनी आपल्या कुटुंबासह सौदी अरेबियामध्ये आठ वर्षे निर्वासन घालवले. 2008 मध्ये ते दुसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले आणि 2013 मध्ये तिसऱ्यांदा सत्तेवर आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com