US Student Visa: अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना 'दे धक्का'! स्टुडंट व्हिसा मंजुरीत 62 टक्क्यांची घसरण; रिपोर्टमधून खुलासा

US Student Visa Drop For Indian Students 2025: अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली.
US Student Visa Drop For Indian Students 2025
donald trumpDainik Gomantak
Published on
Updated on

US Student Visa Drop For Indian Students 2025: अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली. 2025 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अमेरिकन स्टुडंट व्हिसाच्या संख्येत लक्षणीय घट झाली. विशेष म्हणजे, भारताची ही घसरण शेजारील देश चीनच्या तुलनेतही खूप मोठी आहे.

अमेरिकेच्या 'सेंटर फॉर इमिग्रेशन स्टडीज' च्या ताज्या रिपोर्टनुसार, मे ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अमेरिकन दूतावासांनी भारतीय विद्यार्थ्यांना केवळ 22,149 एफ-1 स्टुडंट व्हिसा जारी केले. तर, 2024 मधील याच कालावधीत हा आकडा 58,694 इतका होता. म्हणजेच अवघ्या एका वर्षात भारतीय विद्यार्थ्यांच्या (Student) व्हिसा मंजुरीत तब्बल 62 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली.

US Student Visa Drop For Indian Students 2025
America Iran News: 'अमेरिकेची हवा निघाली'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'नो वॉर'च्या घोषणेवर इराणचा तगडा पलटवार VIDEO

दुसरीकडे, चिनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या व्हिसामध्येही घट झाली असली तरी ती भारताच्या तुलनेत बरीच कमी, म्हणजेच 34 टक्के आहे. चीनचा हा आकडा 61,075 वरुन घसरुन 40,034 वर आला आहे. मे ते ऑगस्ट हा काळ अमेरिकन विद्यापीठांमधील नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीचा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. याच काळात सुमारे 75 टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हिसा मिळतो. त्यामुळे या मुख्य कालावधीतच झालेली ही घसरण भारतीय विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी ठरली.

US Student Visa Drop For Indian Students 2025
America Tariff On India: अमेरिकेचा भारताला मोठा दणका! 'फोर्स्ड लेबर' नियमांचा हवाला देत लावला 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ; ट्रेड डीलची चर्चा सुरु असतानाच झटका

कोरोनाचा काळ वगळता, मागील काही वर्षांचा सरासरी आकडा 55,717 इतका राहिला होता, त्या तुलनेत 2025 मधील आकडा 60 टक्क्यांनी कमी आहे.

US Student Visa Drop For Indian Students 2025
Iran America War: पुन्हा इतिहास मोठं वळण घेईल?

व्हिसामध्ये एवढी मोठी घसरण झाली असली, तरी अमेरिकेत प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येत भारत अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनेशनल एज्युकेशन'च्या आकडेवारीनुसार, 2024-25 शैक्षणिक सत्रात अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये 3,63,019 भारतीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर चीन 2,65,919 विद्यार्थ्यांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. अमेरिका एकूण 11.7 लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक वाटा भारत आणि चीनच्या विद्यार्थ्यांचा आहे.

US Student Visa Drop For Indian Students 2025
America Iran Tension: "तुमच्या युद्धनौकांना समुद्रात गाडून टाकू!" ट्रम्प यांच्या आक्रमकतेवर खामेनेईंचा पलटवार; इराणची अमेरिकेला थेट विनाशाची ताकीद

या रिपोर्टमध्ये अमेरिकेतील 'ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग' या सुविधेचाही उल्लेख करण्यात आला, ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेत काम करण्याची संधी मिळते. यामध्ये 1,43,740 विद्यार्थ्यांसह भारतीय आघाडीवर आहेत. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात 3 वर्षे काम करण्याची मुभा देणाऱ्या 'स्टेम ऑप्ट एक्सटेंशन' योजनेतही 79,331 मंजुरीसह भारतीय विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर आहेत.

US Student Visa Drop For Indian Students 2025
America Iran Tension: "तुमच्या युद्धनौकांना समुद्रात गाडून टाकू!" ट्रम्प यांच्या आक्रमकतेवर खामेनेईंचा पलटवार; इराणची अमेरिकेला थेट विनाशाची ताकीद

'सीआयएस'च्या मते, जर व्हिसा मंजुरीचा हा मंदावलेला वेग असाच राहिला, तर आगामी काळात अमेरिकेतील विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेवर आणि तेथील कार्यबळावर (Workforce) विपरित परिणाम होऊ शकतो. भविष्यात हा मुद्दा अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चर्चेचा प्रमुख भाग बनण्याची दाट शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com