Israel America Relations: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं रक्तरंजित युद्ध संपायचं नाव घेत नाहीये. अमेरिकेच्या प्राणघातक शस्त्रास्त्रे आणि स्वतःच्या सामर्थ्याने इस्रायल गाझामधील पॅलेस्टिनी शहरांवर हल्ल्यांवर हल्ले करत आहे.
या युद्धात इस्रायलची दोन उद्दिष्टे आहेत - पहिले, आपल्या ओलीसांची सुरक्षित सुटका आणि दुसरे हमासच्या दहशतवाद्यांची पाळेमुळे उखडून टाकणे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यावर नाराज झाल्याचे वृत्त आहे. बायडन यांचा राग इतका वाढला की, त्यांनी नेतन्याहू यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्दही वापरले. POLITICO च्या रिपोर्टनुसार, बायडन यांनी नेतन्याहू यांना 'सर्वात मूर्ख माणूस' म्हटले.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2015 मध्ये इस्रायलच्या भूमीवर हमासने मोठा हल्ला केला, तेव्हाच इस्रायलला हमासला (Hamas) संपवण्याची संधी आणि ठोस कारण दोन्ही मिळाले. हमासच्या हल्ल्यापासून, इस्रायली सैन्य पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना निवडून मारत आहे. मात्र, या हल्ल्यात निरपराधांचेही मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत.
गाझा पट्टीतील हत्याकांडातील मृतांचा आकडा आतापर्यंत 26 हजारांच्या पुढे गेला आहे. एवढेच नाही तर त्यात 70 टक्के महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या भाषणात हमासचा अंत होईपर्यंत युद्ध सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे यूएनसह अनेक जागतिक संस्था गाझामधील निरपराध लोकांबद्दल चिंतेत आहेत.
आता बेंजामिन नेतन्याहू यांच्या आडमुठेपणाचा फटका अमेरिकेलाही सहन करावा लागत आहे. अमेरिकन नागरिक इस्रायलला दिलेल्या समर्थनावरुन बायडन सरकारवर टीका करत आहेत. गाझामधील हत्याकांडावरुन बायडन यांनाही लक्ष्य केले जात आहे.
बायडन यांना माहित आहे की, यामुळे आगामी राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांनी नेतन्याहू यांच्यावर राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, बायडन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नेतन्याहू सरकारला गाझामधील जमिनीवरील आक्रमण थांबवून कत्तल कमी करण्याचा सल्ला दिला होता.
POLITICO च्या रिपोर्टनुसार, बायडन यांनी आता नेतन्याहू यांच्यावर वैयक्तिकरित्या राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. POLITICO ने वृत्त दिले आहे की, नेतन्याहू यांच्यावर बायडन नाराज आहेत कारण अमेरिकेचे अध्यक्ष इस्रायली पंतप्रधानांबद्दल साशंक झाले आहेत की नेतन्याहू अमेरिकेला मध्यपूर्वेतील युद्धात ओढू शकतात. नेतन्याहू सध्या हमासविरुद्धच्या युद्धात अमेरिकेकडून शस्त्रे घेत आहेत. दरम्यान, अमेरिकन सैन्यही लवकरच या युद्धात सामील होणार असून त्यामुळे गाझामधील युद्धविरामासाठी जागतिक दबाव कमी होईल. यामुळे नेतन्याहू यांना गाझा पट्टीमध्ये त्यांच्या इच्छेनुसार हल्ले करण्यास मोकळा लगाम मिळेल.
तथापि, जो बायडन यांचे प्रवक्ते अँड्र्यू बेट्स यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग केला नसल्याचे सांगितले. बेट्स म्हणाले की "ते तसे बोलले नाहीत". बेट्स पुढे म्हणाले की, बायडन आणि नेतन्याहू सार्वजनिक आणि खाजगीरित्या दोघेही एकमेकांचा आदर करतात," पॉलिटिकोने अहवाल दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.