भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Specialty Drugs Exempt From New US Tariff: अमेरिकेने ठराविक पेटेंट असलेल्या औषधांच्या आयतीवर 100 टक्के इतकी मोठी कस्टम ड्युटी लावण्याचा निर्णय घेतला असून, या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली.
Specialty Drugs Exempt From New US Tariff
Specialty Drugs Exempt From New US TariffDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Specialty Drugs Exempt From New US Tariff: अमेरिकेने ठराविक पेटेंट असलेल्या औषधांच्या आयतीवर 100 टक्के इतकी मोठी कस्टम ड्युटी लावण्याचा निर्णय घेतला असून, या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र, या नव्या कररचनेतून अनेक अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांना वगळण्यात आल्यामुळे जागतिक आरोग्य क्षेत्रासह औषध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. कॅन्सर, दुर्मिळ आजार, वंध्यत्व आणि इतर आणीबाणीच्या वैद्यकीय गरजांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष औषधांवर हा 100 टक्के कर लागू होणार नाही.

भारतासाठी (India) ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर ठरली. नव्या नियमानुसार, अमेरिकेत शून्य टक्के शुल्कासह आपल्या विशेष औषधांची निर्यात करु शकणाऱ्या 20 प्रमुख देशांच्या यादीत भारताचा समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे, भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर निर्यात करत असलेली 'जेनेरिक औषधे' आधीपासूनच या नव्या टॅरिफ नियमावलीच्या बाहेर ठेवण्यात आली. त्यामुळे भारतीय फार्मा कंपन्यांवर या 100 टक्के कराचा कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही.

Specialty Drugs Exempt From New US Tariff
America Tariff: ट्रम्प यांची स्वाक्षरी अन् जागतिक व्यापारात खळबळ! रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के टॅरिफचा चाबूक; भारतासह चीनला मोठा फटका

नव्या धोरणांतर्गत अनेक प्रगत आणि आणीबाणीच्या औषधोपचारांना या करामधून सूट देण्यात आली. यामध्ये दुर्मिळ आजारांवरील 'ऑर्फन ड्रग्ज', कॅन्सरच्या उपचारासाठी लागणारी 'न्यूक्लियर मेडिसिन', इम्युन डेफिशिएन्सीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'प्लाझ्मा थेरपी' आणि 'फर्टिलिटी मेडिसिन'चा समावेश आहे. याशिवाय सेल व जीन थेरपी, कॅन्सरवरील 'अँटीबॉडी ड्रग्ज', जैविक धोक्यांवरील औषधे आणि जनावरांच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या औषधांनाही या करातून पूर्ण सवलत मिळाली.

Specialty Drugs Exempt From New US Tariff
America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय फार्मा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. ठराविक निकष पूर्ण करणाऱ्या भारतीय कंपन्यांना आपली औषधे आणि लागणारा कच्चा माल अतिरिक्त कराशिवाय अमेरिकन बाजारपेठेत पाठवता येईल. यामुळे भारतातील औषध निर्मिती क्षेत्रावरील खर्च वाढणार नाही आणि अमेरिकेतील भारतीय औषधांचा पुरवठा सुरळीत सुरु राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Second Gold Medal At Asian Games
Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
MEA India Energy Security Statement US Tariff
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com