USA: रशियन लष्करी उपकरणांना पर्याय शोधण्यात भारताला मदत करणार अमेरिका

USA: भारताने या युद्धाबाबत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असून रशियाबरोबरचा भारताचा व्यापार सुरुच ठेवला आहे.
USA
USADainik Gomantak

USA: रशिया आणि युक्रेनचे युद्ध गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.या युद्धाचा परिणाम फक्त या दोन देशांवरच होत नसून संपुर्ण जगावर होत आहे. युरोपीय राष्ट्रांनी रशियाने हे युद्ध मागे घ्यावे यासाठी रशियावर दबाव आणण्याचा केलेला प्रयत्न असफल झाल्याचे दिसून येत आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून भारतानेसुद्धा रशियाबरोबरचा व्यापार थांबवावा असे आवाहन अमेरिकेने केले होते. मात्र भारताने या युद्धाबाबत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असून रशियाबरोबरचा भारताचा व्यापार सुरुच ठेवला आहे.

आता भारताचे रशियावरचे अवलंबित्व कमी करावे यासाठी अमेरिका प्रयत्न करताना दिसून येत आहे. अमेरिकेच्या नेत्या व्हिक्टोरिया नुलँड यांनी म्हटले आहे की, रशियावरील भारताचे अवलंबित्व कमी व्हावे म्हणून भारताला रशियन लष्करी उपकरणांना पर्याय शोधण्यात मदत केली पाहिजे.

अमेरिकेच्या नेत्या व्हिक्टोरिया नूलँड म्हणाल्या की, भारत 60 वर्षांपासून संभ्रमात अडकला आहे, परंतु जगाच्या भल्यासाठी त्याला ठोस पावले उचलावी लागतील. रशियन लष्करी उपकरणांना पर्याय शोधण्यासाठी भारत अमेरिकेची मदत घेण्यास तयार होईल, अशी अमेरिकेला आशा आहे.

यापुर्वी अमेरिकेच्या तीव्र आक्षेपानंतरही भारताने रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केली आहे. अमेरिकेने वेळोवेळी भारताने रशियाऐवजी अमेरिकेकडून क्षेपणास्त्र खरेदी करावीत असा सल्ला दिला आहे.

USA
New Zealand Flood: न्यूझीलंडमध्ये भीषण पुरामुळे आणीबाणी घोषित; 3 मृत्यू, 1 बेपत्ता

दरम्यान, भारत आणि रशियाचे संबंध भारताच्या स्वातंत्र्यापासून उत्तम आहेत. रशियाने भारताप्रति नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. त्यामुळे भारत अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारत असला तरीही रशियाबरोबरचे संबंध बिघडणार नाहीत याची सातत्याने काळजी घेत असतो.

रशिया ( Russia )-युक्रेन युद्धाच्या काळात युरोपीय राष्ट्रांनी रशियाबरोबरच्या व्यापाराला बंदी घातल्याने रशियाने कच्चा तेलाची निर्यात सवलतीच्या दरात विकण्यास सुरुवात केली होती. आयात करणाऱ्या देशांपैकी भारत सर्वात मोठा आयातदार देश असल्याचे दिसून आले होते. आता अमेरिके( USA )च्या प्रस्तावाचा भारत विचार करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com