New Zealand Flood: न्यूझीलंडमध्ये भीषण पुरामुळे आणीबाणी घोषित; 3 मृत्यू, 1 बेपत्ता

मुसळधार पावसाने अनेक प्रवासी विमानतळावर अडकले
New Zealand Flood
New Zealand FloodTwitter
Published on
Updated on

New Zealand Flood: मुसळधार पाऊस आणि पुरामुळे न्यूझीलंडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑकलंडमध्ये रस्त्यांवर अनेक फुटांपर्यंत पाणी आहे. अनेक घरे पाण्यात गेली असून विमानतळावरही पाणी तुंबले आहे. न्यूझीलंडमधील या स्थितीमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

New Zealand Flood
Imran Khan: माझ्या हत्येसाठी झरदारींनी दहशतवाद्यांना पैसे दिले... इम्रान खान यांचा आरोप

दरम्यान, पुर-पावसामुळे आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स शनिवारी म्हणाले की, मुसळधार पावसामुळे देशात पुरस्थिती निर्माण झाली आहे.

तीन लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किमान एक बेपत्ता आहे. दरम्यान, पंतप्रधान हिपकिन्स यांनी आपत्कालीन सेवेशी संबंधित अधिकार्‍यांशी बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

पुरामुळे नुकसान

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये मुसळधार पूर आणि पावसामुळे आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. आकाशातून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऑकलंडच्या रस्त्यांवर अनेक फूट पाणी साचले आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहने पाण्यात अडकल्याचे दिसून आले. लोकांच्या घरात पाणी शिरले. ऑकलंड विमानतळावरही पूर आला असून अनेक प्रवासी अडकले आहेत. पुरामुळे तिघांना जीव गमवावा लागला आहे.

ऑकलंड विमानतळावर आलेल्या पुराच्य पाण्याचा व्हिडिओ हरिष देशमुख या युजरने ट्विटरवरून शेअर केला आहे.

New Zealand Flood
Pakistan Currency: पाकिस्तान आणखी गाळात; डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

पुरग्रस्त भागाला पंतप्रधानांची भेट

पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनीही ऑकलंडमधील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. शनिवारी, हिपकिन्स हे पूरग्रस्त भागात फेरफटका मारण्यासाठी ऑकलंडच्या उत्तरेकडील वैनुआपाई येथे जाऊन आले.

हिपकिन्स यांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "ही एक अभूतपूर्व घटना आहे. ऑकलंडमध्ये सरकार सर्वांच्या पाठीशी उभे आहे. लोक एकमेकांची काळजी घेत आहेत. लोकांना लागेल ती मदत दिली जाईल. लोकांनी दयाळूपणा दाखवावा. धीर धरावा. तुम्ही सर्वजण यातून लवकरच बाहेर पडाल.

दरम्यान, खराब हवामानामुळे त्यांचा ऑकलंड दौरा लांबला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. दुसरीकडे, एल्टन जॉनच्या कॉन्सर्टसह शहरातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com