अमेरिकेतील डेन्व्हरमध्ये कोलोरॅडोमधील जंगलात लागलेल्या आगीमुळे सुमारे 580 घरे, एक हॉटेल आणि एक शॉपिंग सेंटर जळून खाक झाले. आजूबाजूच्या परिसरातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बोल्डर काउंटीचे शेरीफ जो पेले यांनी सांगितले की, एक व्यक्ती जखमी झाल्याची नोंद आहे. संपूर्ण परिसरात 105 mph (169 kph) वेगाने वारे वाहू लागले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग वेगाने पसरत होती. तथापि, इतर लोकांच्या जीवितहानीची शक्यता नाकारण्यात आली आहे (Fire in US Colorado). 2.5 स्क्वेअर मैल (6.5 square kilometers) मध्ये पसरलेल्या जंगलातील आगीमुळे परिसरातील अनेक भाग धुराने भरले असून आकाशात ज्वाला उठताना दिसत आहेत. सुमारे 21,000 लोकसंख्या असलेल्या लुईव्हिल शहराला स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले. अमेरिकेतील आगीची ही ताजी घटना आहे.
गुरुवारी आग लागली
सुमारे 13,000 लोकसंख्या असलेल्या सुपीरियरला रिकामे करण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. ही शेजारची शहरे डेन्व्हर ( Colorado Fire News) च्या वायव्येस अंदाजे 20 मैल (32 किलोमीटर) अंतरावर आहेत. कोलोरॅडोच्या जंगलात गुरुवारी ही आग लागली. दरम्यान, प्रवक्त्या केली क्रिस्टेनसेन यांनी म्हटले, भाजलेल्या सहा जणांवर UCHealth Broomfield हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यूएस (America) हायवे-36 चा एक भागही बंद करण्यात आला आहे.
आपातकाल घोषित करण्यात आला
कोलोरॅडोमध्ये (Colorado), 53,500 लोकांना अंधारातच राहणे भाग पडले. एकट्या बोल्डर काउंटीमध्ये 18,791 लोक अंधारात रहावे लागत आहेत. कोलोरॅडोचे गव्हर्नर जेरेड पॉलिस यांनी बोल्डर काउंटीमध्ये लागलेल्या आगीमुळे आपत्कालीन स्थिती म्हगणून घोषित केली असल्याचे राज्यपाल कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार सांगण्यात आले. राज्यपाल कार्यालयाने म्हटले की, "फ्रंट रेंजमध्ये जोरदार वाऱ्यामुळे लागलेल्या आगीमुळे आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे." सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये विध्वंस दिसून येत आहे. शहर रिकामे करताना रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये लोक गर्दीत धावताना दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.