2022 साली कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू येणार; बाबा वंगांची भविष्यवाणी

बाबा वंगा (Baba Vanga) यांनी आतापर्यंत केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.
Baba Vanga

Baba Vanga

Dainik Gomantak 

Published on
Updated on

बल्गेरियाचे 'भविष्यवक्ते' बाबा वंगा पुन्हा एकदा आपल्या भविष्यवाणीसाठी चर्चेत आले आहेत.
2022 साली करोनापेक्षाही घातक विषाणूला जगाला तोंड द्यावं लागेल, अशी भविष्यवाणी (Prophecy) बाबा वंगा यांनी केली आहे. बाबा वंगा (Baba Vanga) यांनी आतापर्यंत केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Baba Vanga</p></div>
चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

यामध्ये अमेरिकेत (America) अलकायदाकडून करण्यात आलेला 9/11 हल्ल्यासाह त्सुनामी येणार या सारख्या अनेक भविष्यावण्यांचा समावेश आहे. बाबा वंगा यांना बाल्कन प्रदेशातील 'नॉस्ट्राडेमस' म्हणूनही ओळखलं जातं. बाबा वंगा यांनी भारतासाठीही (India) धोक्याचा इशारा दिला आहे. टोळ हल्ल्यामुळे भारतावर उपासमारीची वेळ येऊ शकते, असं त्यांच भाकीत केलं आहे.

कोण होते बाबा वंगा?
बाबा वंगा यांचं खरं नाव वेंगेलिया गुश्तेरोवा असं आहे. बाबा वंगा यांचा जन्म 1991 मध्ये झाला होता तर 1996 मध्ये त्यांचं निधन झालंय. आपल्याकडे भविष्य पाहण्याची शक्ती असल्याचा दावा वंगा यांनी केला होता. एवढंच न्हवे तर, त्यांनी स्वत:च्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती.

त्यांच्या काही खऱ्या ठरलेल्या भविष्यवाणी
1. 2002 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला.
2. 2004 साली आलेली त्सुनामी.
3. एका आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड.

<div class="paragraphs"><p>Baba Vanga</p></div>
अमेरिकन लष्करी 'न्यायव्यवस्थेत' होणार सुधारणा

2022 सालासाठी बाबा वंगा यांची भविष्यवाणी
1. नवीन वर्षात जगाला नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागेल.
2.ऑस्ट्रेलिया (Australia) आणि अनेक आशियाई देशांमध्ये भीषण पूर येऊ शकतो.
3. 2022 साली करोनापेक्षाही अधिक धोकादायक व्हायरस जगात हाहाकार माजवू शकतो.
4. जगभरात पिण्याचं पाणी हा चिंतेचा विषय ठरू शकतो. येत्या वर्षभरात जगातील अनेक देशांना पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.
5. 2022 साली पृथ्वीवरील जीवनाचा शोध घेण्यासाठी परग्रहवासियांकडून 'ओमुआमुआ' हा लघुग्रह धाडला जाईल, अशी भविष्यवाणीही वंगा यांनी आपल्या मृत्यूपूर्वी करून ठेवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com