VIDEO: 900 कोटींचे फायटर जेट जळून खाक! F-35B स्टील्थ विमानाचा भीषण अपघात; पायलटने वेळेत उडी घेतल्याने वाचला जीव

F35b Stealth Fighter Jet Crash San Diego: सैन डिएगो येथे मिरामार एअर बेसजवळ अमेरिकन मरीन कॉर्प्सचे अत्यंत शक्तिशाली F-35B स्टील्थ फायटर जेट शुक्रवारी (31 जुलै) भीषण अपघाताचा बळी ठरले.
F35b Stealth Fighter Jet Crash San Diego
F35b Stealth Fighter JetDainik Gomantak
Published on
Updated on

F35b Stealth Fighter Jet Crash San Diego: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सैन डिएगो येथे मिरामार एअर बेसजवळ अमेरिकन मरीन कॉर्प्सचे अत्यंत शक्तिशाली F-35B स्टील्थ फायटर जेट शुक्रवारी (31 जुलै) भीषण अपघाताचा बळी ठरले. सुदैवाने, विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वीच पायलटने अचूक वेळेत बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. मरीन कॉर्प्सने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार, पायलटाला किरकोळ दुखापती झाल्या असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

उपचारासाठी त्याला तातडीने स्थानिक वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेचा एक थरारक एरियल व्हिडिओ देखील समोर आला, ज्यामध्ये माती असलेल्या मैदानात विमान जळताना आणि त्यातून काळा धूर निघताना दिसत आहे. त्याचवेळी, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पोहोचून विमानाला लागलेली आग आटोक्यात आणली.

F35b Stealth Fighter Jet Crash San Diego
America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दोन फायटर जेट्स एकत्र रनवेच्या दिशेने लँडिंगसाठी येत होते. त्यापैकी पहिले जेट सुरक्षितपणे जमिनीवर उतरले, परंतु दुसरे F-35B जेट अचानक हवेत मंदावले आणि सुमारे 100 फूट उंचीवर असताना त्याचा तोल गेला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पायलटने लगेचच इजेक्ट बटण दाबले, ज्यामुळे त्याचा पॅराशूट उघडला आणि तो सुरक्षितरीत्या बाहेर पडला. त्यानंतर अवघ्या काही सेकंदांत हे कोट्यवधी रुपयांचे फायटर जेट थेट जमिनीवर आदळले आणि मोठा स्फोट होऊन त्याला भीषण आग लागली.

F35b Stealth Fighter Jet Crash San Diego
America Tariff On India: अमेरिकेचा भारताला मोठा दणका! 'फोर्स्ड लेबर' नियमांचा हवाला देत लावला 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ; ट्रेड डीलची चर्चा सुरु असतानाच झटका

F-35B हे जगातील सर्वात आधुनिक आणि महागड्या फायटर जेट्सपैकी एक मानले जाते. मरीन कॉर्प्सच्या ताफ्यात असलेल्या या विमानाची किंमत सुमारे 109 दशलक्ष डॉलर (अंदाजे 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहे. कमी अंतरावर टेक-ऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग करण्याची अद्वितीय क्षमता या विमानात आहे. अमेरिकन लष्करी विश्लेषकांच्या मते, F-35 श्रेणीतील विमाने ही ताफ्यातील सर्वात सुरक्षित मानली जातात. असे असले तरी, मरीन कॉर्प्सने या भीषण अपघाताचा 'क्लास A' दुर्घटनेच्या श्रेणीत समावेश केला. 2 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त नुकसान किंवा विमान पूर्णपणे नष्ट झाल्यास या श्रेणीचा वापर केला जातो. सध्या लष्कराकडून या अपघाताच्या (Accident) कारणांचा सखोल तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com