US ने तालिबानच्या हातात सोडली 7 अब्ज डॉलरची शस्त्रे, पेंटागॉनच्या अहवालातून खुलासा

अमेरिकेने (America) अफगाणिस्तानला अब्जावधी डॉलरची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे दिली होती.
Taliban
TalibanDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेने अफगाणिस्तानला अब्जावधी डॉलरची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे दिली होती. परंतु जेव्हा तालिबानने सत्ता आपल्या ताब्यात घेतली तेव्हा अमेरिकेने घाईघाईने युद्धग्रस्त देश सोडला. मात्र त्यांनी अफगाणिस्तानला दिलेली शस्त्रे मागे राहिली. आता पेंटागॉनच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. (US leaves 7 billion Dollars weapons in Afghanistan Pentagon report reveals)

Taliban
अफगाणिस्तान पुन्हा हादरले, मशिदीत बॉम्बस्फोट

सीएनएनच्या वृत्तानुसार, काँग्रेसला दाखविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, तालिबानच्या (Taliban) ताब्यानंतर अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) एकूण सात अब्ज डॉलर्स (5,35,57,38,50,000 रुपये) ची लष्करी शस्त्रे मागे राहिली. यामध्ये काबूल विमानतळावर सोडण्यात आलेल्या एक अब्ज डॉलर्सच्या एअरक्राफ्टचा देखील समावेश आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये 22 हजार लष्करी वाहने आणि कम्युनिकेशनसाठी वापरण्यात येणारी उपकरणे मागे पडल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे. काबूलवरील ताब्यानंतर लढाख्यांनी शस्त्रे, वाहने आणि इतर लष्करी साधने आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर काही तालिबानी लढाखे नाइट व्हिजनसह पोज देतानाही दिसले. विशेष म्हणजे अमेरिकेची ही शस्त्रे आता त्यांच्या शत्रूच्या हातात गेली आहेत. दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षाने ही शस्त्रे आणि लष्करी उपकरणे अफगाणिस्तानात सोडल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. ही शस्त्रे परत आणण्यासाठी पक्षाने राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्यावरही दबाव आणला आहे.

Taliban
अफगाणिस्तान- पाकिस्तानमध्ये सुरू होणार बस सेवा

तालिबानने कोणती शस्त्रे ताब्यात घेतली

मात्र, ही शस्त्रे अफगाणिस्तानात आणण्याची किंवा नष्ट करण्याची संरक्षण खात्याची कोणतीही योजना नसल्याचे पेंटागॉनच्या अहवालात म्हटले आहे. या शस्त्रांची विशेष प्रकारची देखभाल करावी लागते. मात्र, तालिबानला या शस्त्रांचा मोठा फायदा होणार आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सोडलेल्या शस्त्रांमध्ये हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या 9,524 शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. यामध्ये बॉम्ब, मशीन गन, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट, हवेत मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे. या शस्त्रांची किंमत $6.54 दशलक्ष आहे. काबूलमध्ये 78 विमाने सोडण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. अफगाण सैन्याला पुरवलेल्या अंदाजे 100,000 गाड्यांपैकी 40,000 हून अधिक गाड्या अफगाणिस्तानात राहिल्या.

अफगाण सुरक्षा दलांना देण्यात आलेल्या 4,27,300 शस्त्रांपैकी 300,000 हून अधिक शस्त्रे मागे राहिली. अहवालात असेही म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये 42,000 नाईट व्हिजन, सर्विलान्स, 'बायोमेट्रिक आणि पोझिशनिंग उपकरणे' मागे राहिली आहेत. याशिवाय सहा दशलक्ष डॉलर्सची ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरही तालिबानच्या हाती गेली. त्याचवेळी अफगाण लष्कराची 150 विमानेही तालिबानच्या ताब्यात गेली. तालिबानने ताब्यात घेतलेल्या इतर अमेरिकन विमानांमध्ये चार C-130 वाहतूक विमाने, 23 ब्राझिलियन-निर्मित A-29 'सुपर टुकानो' टर्बोप्रॉप ग्राउंड-अटॅक विमाने, 45 UH-60 ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आणि 50 लहान हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com