US Drone Attack: अमेरिकेच्या MQ-9 रीपरची सीरियामध्ये कमाल; ISIS च्या म्होरक्याला ठार केल्याचा दावा

सीरियात MQ-9 रीपर ड्रोन हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा एक प्रमुख दहशतवादी मारल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
MQ-9
MQ-9Dainik Gomantak
Published on
Updated on

US MQ-9 रीपर ड्रोनने सीरियामध्ये ISIS च्या प्रमुख दहशतवाद्याला ठार केले. हल्ल्याच्या वेळी हा टॉपचा दहशतवादी बाइकवरून प्रवास करत होता.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सीरियामध्ये MQ-9 रीपर स्ट्राइकची पुष्टी केली आहे. इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेचा एक प्रमुख नेता सीरियामध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

विभागाचे म्हणणे आहे की घटनेच्या काही तास आधी, रशियन लढाऊ विमानांनी सीरियाच्या पश्चिम भागात यूएस एमक्यू-9 रीपर ड्रोनचा पाठलाग करत अडथळा निर्माण केला.

अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रशियन लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी रीपर ड्रोन उड्डाण करत असताना त्यांना सुमारे दोन तास त्रास दिला.

अशा परिस्थितीत ड्रोनने अलेप्पो परिसरात मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या उसामा अल-मुहाजिरला लक्ष्य केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

या अधिकाऱ्याला या प्रकरणावर सार्वजनिक विधान करण्याचा अधिकार नाही आणि त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर लष्करी कारवाईशी संबंधित माहिती दिली.

MQ-9
EasyJet: "20 प्रवासी उतरले तरचं विमान उड्डाण करेल..." स्पेनहून इंग्लंडला निघालेल्या फ्लाइटमध्ये सावळा गोंधळ

अधिकाऱ्याने सांगितले की हल्ल्याच्या वेळी अल-मुहाजिर हा वायव्य सीरियात होता. ठार झालेला अल-मुहाजिर असल्याची पुष्टी अमेरिकन सैन्याने कशी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इतर कोणतीही माहिती दिलेली नाही.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात नागरिकांच्या जीवितहानीचे कोणतेही संकेत नाहीत. कोणी नागरिक जखमी झाला आहे का, याचा शोध लष्कर घेत आहे.

MQ-9
Earthquake In Afghanistan: फैजाबादमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 4.4 तीव्रता

या हल्ल्यात सर्वसामान्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात सामान्य लोक मारले गेल्याची कोणतीही माहिती नाही.

वॉशिंग्टनने सीरियात आयएसआयएसच्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. ISIS च्या अनेक नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे.

अमेरिकेने दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेत इसिसचा माजी प्रमुख अबू बकर अल बगदादीलाही मारले होते. दहशतवादी बगदादीने स्वतःला मुस्लिमांचा खलीफा घोषित केले होते. तेव्हापासून, त्याच्या अनेक नेत्यांनाही लक्ष्य करण्यात आले ज्यांनी परदेशात अनेक हल्ल्यांची योजना आखली होती.

अमेरिकन लष्करी कमांडर्सच्या मते, ISIS हा एक महत्त्वाचा धोका आहे. अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांनी त्याचे कंबरडे मोडले आहे पण ते आपले नेटवर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com