Earthquake In Afghanistan: फैजाबादमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 4.4 तीव्रता

आज सकाळी १२ च्या सुमारास अफगानिस्तानच्या फैजाबादपासून ९३ किमी अंतरावर भूंकपाचे धक्के जाणवले आहे.
Earthquake In Afghanistan
Earthquake In AfghanistanDainik Gomantak
Published on
Updated on

Earthquake In Afghanistan: अफगानिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.आज सकाळी १२ च्या सुमारास अफगानिस्तानच्या फैजाबादपासून ९३ किमी अंतरावर भूंकपाचे धक्के जाणवले आहे. रिश्टल स्केलवर ४.४ एवढी तीव्रता होती. अद्याप कोणतीही जावित आणि वित्त हानी झालेली नाही.

  • भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी. 

त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. 

जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे. 

याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

  • भूकंपाचे शास्त्रीय कारण देखील जाणून घ्या

भूकंप कसे आणि का होतात हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. वास्तविक ही पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रव लावा आहे.

या प्लेट्स सतत तरंगत राहतात आणि अनेक वेळा एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे अनेक वेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब आल्यावर या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून बाहेर पडणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि या गडबडीनंतर भूकंप होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com