China Policy: मध्यपूर्वेतील शी जिनपिंग यांचे मनसुबे फस्त, अमेरिकेने खेळला मोठा डाव; वाचा संपूर्ण प्रकरण

China Policy: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवून चीनला मध्यपूर्वेत जागतिक लीडर म्हणून स्वत:ला प्रस्थापित करायचे आहे.
Xi Jinping & Joe Biden
Xi Jinping & Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

China Policy: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवून चीनला मध्यपूर्वेत जागतिक लीडर म्हणून स्वत:ला प्रस्थापित करायचे आहे. त्यामुळेच तो सातत्याने युद्धबंदीचा वकिली करत आहे आणि जगातील देशांकडे त्यासाठी आवाहन करत आहे. दरम्यान, सौदी अरेबियातील मुले चिनी भाषा मँडरीन मोठ्या उत्साहाने शिकत आहेत.

सौदी सरकारच्या शिक्षण विभागाने या संदर्भात नुकतेच एक परिपत्रक जारी केले होते की, माध्यमिक स्तरावरील सरकारी आणि खाजगी शाळांमधील मुलांना दर आठवड्याला मँडरीनचे किमान दोन धडे शिकवले जावेत. हा उपक्रम सौदी अरेबिया आणि चीन यांच्यातील घनिष्ठ संबंधांची कहाणी सांगतो.

दरम्यान, मुलांना मँडरीन शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय सौदी अरेबियाचे शक्तिशाली नेते, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी घेतला होता, जो चीनसोबत "सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी" तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या वर्षी ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाला BRICS समिटमध्ये सामील होण्यासाठी अनौपचारिकपणे आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात चीन, ब्राझील, रशिया (Russia), भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

Xi Jinping & Joe Biden
China-Australia: चीनच्या आठमुठेपणामुळे ऑस्ट्रेलियाचे नौसेनिक झाले जखमी

सौदीमध्ये 5.5 अब्ज डॉलरची चीनी गुंतवणूक

सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था (Economy) बहुआयामी बनवण्याची क्राउन प्रिन्स यांची दृष्टी आहे. त्यासाठी ते तेल सोडून इतर उत्पन्नाच्या स्रोतांमधून अर्थव्यवस्थेत वैविध्य आणण्याचे पुरस्कर्ते आहेत. चीनने त्यांच्या मोहिमेत प्रचंड रस दाखवला आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

त्याचबरोबर पायाभूत सुविधांमध्ये संधी आणि सौदी अरेबियामध्ये हरित ऊर्जेच्या संक्रमणावर भर देऊन आदर्श स्थिती निर्माणा केल्याचा दावा चिनी लोक करतात. इकॉनॉमिस्टच्या मते, 2022 च्या पहिल्या सहामाहीत, सौदी अरेबियाला चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे 5.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक प्राप्त झाली जी इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.

सौदीमध्ये चीनी गुंतवणूकदारांचे भव्य स्वागत

अलीकडील गुंतवणूक करारांमध्ये तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, कृषी, रिअल इस्टेट, खनिजे, लॉजिस्टिक, पर्यटन आणि आरोग्य सेवा यांचाही समावेश आहे. झेजियांग-आधारित इनोव्हेट मोटर्स सारख्या इलेक्ट्रिक वाहनांच्या चीनी उत्पादकांचे सौदी अरेबियामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले आहे, जे त्यांना युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये मिळालेल्या प्रतिसादाच्या अगदी उलट आहे.

Xi Jinping & Joe Biden
South China Sea: दक्षिण चीन समुद्रात 'चीन' ची पुन्हा दादागिरी, फिलिपाइन्ससोबत पंगा...

प्रादेशिक तणावामुळे खेळ खराब झाला

दरम्यान, सौदी-चीन मैत्री वेगाने पुढे सरकत होती. पण इस्रायल-हमास युद्धामुळे चिनी गुंतवणूकदार चिंतेत आहेत. तसेच, मध्यपूर्वेतील या तणावात चीनच्या भूमिकेवर शंका निर्माण झाली आहे.

चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे की, त्यांचा देश मध्य पूर्वेतील सतत वाढत चाललेला संघर्ष आणि गाझा पट्टी आणि इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मृत्यूबद्दल अत्यंत चिंतेत आहे.

चीनच्या 50% तेल आखाती देशांमधून आयात होते

खरे तर, इस्रायल-हमास युद्धादरम्यान कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 92 वर पोहोचली. या चिंतेत मध्यपूर्वेतील चीनचे विशेष दूत झांग जून यांनी तेल पुरवठा साखळी अबाधित राहावी यासाठी या प्रदेशाला भेट दिली.

चीन हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा खरेदीदार आहे. 50 टक्क्यांहून अधिक तेलाची गरज गल्फ कोऑपरेशन कॉन्सिलमधून भागवली जाते, त्यापैकी 18 टक्के एकट्या सौदी अरेबियातून तेल चीन आयात करतो.

Xi Jinping & Joe Biden
China Economic Crisis: सुपर पॉवर होण्याचे स्वप्न भंगणार! चीन अर्थव्यवस्थेला संकटांनी घेरले

अमेरिका इस्रायलचा समर्थक आहे तर चीन पॅलेस्टाईनचा समर्थक आहे

दुसरीकडे, 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करुन 1200 इस्रायलची हत्या केली. याशिवाय, हमासच्या दहशतवाद्यांनी 240 लोकांचे अपहरण करुन त्यांना गाझा येथे नेले, जिथे त्यांना ओलीस ठेवण्यात आले.

तेव्हापासून, इस्रायली सुरक्षा दलांनी गाझावर हल्ले करणे सुरुच ठेवले असून, या भागात तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे प्रशासन सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात ऐतिहासिक करार घडवून आणत असताना ही लढाई सुरु झाली.

त्यांना या कराराद्वारे आशा होती की, मध्यपूर्वेत स्थिरता येईल. या प्रदेशातील प्रभावासाठी चीन थेट अमेरिकेशी स्पर्धा करतो. अमेरिका इस्रायलचा समर्थक आहे, तर चीन पॅलेस्टिनी प्रश्नाशी जोडला गेला आहे.

सौदी आणि इस्रायल संबंध पुन्हा सामान्य होणे कठीण

अमेरिकेच्या दबावामुळे आणि नव्याने झालेल्या मैत्रीमुळे सौदी अरेबियाने सुरुवातीला इस्रायलसोबत इतर अरब देशांच्या तुलनेत अधिक मवाळ भूमिका स्वीकारली, परंतु जसजसे इस्रायली सैन्याने गाझा पट्टीत हल्ले सुरु केले तसतसे सौदीचा दृष्टिकोन बदलला.

स्टिमसन सेंटरमधील फेलो जेसी मार्क्स यांनी 'द डिप्लोमॅट'ला सांगितले की, गाझामध्ये इस्रायलच्या कारवाया दीर्घकाळ सुरु राहिल्यास इस्रायल-सौदी संबंध सामान्य होणे कठीण होईल.

तणाव कमी करण्यासाठी इस्रायलचा निषेध करण्यात चीन अरब देशांना सामील करुन घेऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, चीन आपला अन्य मित्र देश इराण या संघर्षात सामील होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे.

Xi Jinping & Joe Biden
China Economic Crisis: सुपर पॉवर होण्याचे स्वप्न भंगणार! चीन अर्थव्यवस्थेला संकटांनी घेरले

हमास आणि इस्रायलमधील करारानंतर काय?

चीनला सौदी अरेबियाशी मैत्री करुन आणि तिथे गुंतवणूक करुन संपूर्ण मध्यपूर्वेत, विशेषतः अरब देशांमध्ये आपले अस्तित्व जाणवून द्यायचे होते, परंतु हमास युद्धाने त्याच्या विस्तारवादी गतीला ब्रेक लावला आहे.

दुसरीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यात मध्यस्थी करुन अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपले अस्तित्व आणि वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

अशा परिस्थितीत, विशेषत: प्रादेशिक सुरक्षा समतोलाच्या दृष्टीने सौदी अरेबिया चीनपेक्षा अमेरिकेवर अधिक विश्वास ठेवण्यास प्राधान्य देईल, जे शी जिनपिंग यांच्या योजनांना हरताळ फासण्यासारखे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com