South China Sea: दक्षिण चीन समुद्रात 'चीन' ची पुन्हा दादागिरी, फिलिपाइन्ससोबत पंगा...

China Philippines Conflict: दक्षिण चीन समुद्रात फिलिपाइन्ससोबत सुरु असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे.
South China Sea
South China SeaDainik Gomantak

China Philippines Conflict: चीन आपली विस्तारवादी वृत्ती सोडायला तयार नाहीये. यातच, दक्षिण चीन समुद्रात फिलिपाइन्ससोबत सुरु असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. या क्रमात, एक चिनी तटरक्षक जहाज फिलिपाइन्सच्या गस्ती जहाजाच्या अगदी जवळ आले. \

मात्र दोन्ही जहाजांची टक्कर टळली. दोघांमधील अंतर अवघे एक मीटर असल्याचे सांगण्यात आले. ही चिंताजनक घटना असून त्यामुळे सागरी क्षेत्रात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वास्तविक, फिलिपाइन्सने (Philippines) शुक्रवारी 'सेकंड थॉमस शोल' नावाच्या वालुकामय आणि खडकाळ सागरी क्षेत्राजवळ चिनी जहाजाच्या उपस्थितीचा तीव्र निषेध केला, जिथे मासे भरपूर प्रमाणात आढळतात.

दोन्ही आशियाई शेजारी देश या भागावर आपला दावा सांगतात. बुधवारी झालेल्या अन्य एका घटनेत फिलिपाइन्स तटरक्षक दलाचे दुसरे जहाज चिनी तटरक्षक दलाने सुमारे आठ तास सोडले नाही.

South China Sea
China Economy: चीनला मोठा झटका! जीडीपी वाढीचा रेट मंदावला, फिच रेटिंग एजन्सीचा दावा

अमेरिकेने प्रतिक्रिया दिली

अमेरिकेने वादग्रस्त सागरी भागात फिलिपाइन्सचे संरक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. फिलिपाइन्स कोस्ट गार्डने निरीक्षण केलेल्या दोन लहान नौका विवादित क्षेत्रात चिनी नाकेबंदी तोडून तिथे पोहोचल्या आणि त्यांनी शोलमध्ये असलेल्या फिलिपाइन्स नौदल चौकीपर्यंत खाद्यसामग्री पोहोचवली.

फिलीपीन तटरक्षक दलाचे प्रवक्ते कमोडोर जे तारिएला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही चीनच्या या हरकतीचा निषेध करतो. ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमांचे उल्लंघन आहे.

चीननेही इशारा दिला आहे

फिलिपाइन्सच्या दोन तटरक्षक जहाजांपैकी एक असलेल्या बीआरपी सिंडनगानने फिलिपाइन्सच्या जहाजापासून अवघ्या एक मीटर अंतरावर असलेल्या चिनी तटरक्षक जहाजाशी टक्कर टाळण्यासाठी आपल्या इंजिनची स्थिती त्वरीत बदलली तेव्हा टक्कर टळल्याचे तारिएल यांनी सांगितले.

एका चीनी कोस्ट गार्ड रेडिओ ऑपरेटरने बीआरपी सिंदागनला वारंवार चेतावणी दिली की "सेकंड थॉमस शोल" आणि त्याच्या बाह्य सागरी क्षेत्रावर "चीनचे (China) निर्विवाद सार्वभौमत्व आहे", त्यामुळे कोणताही वाद टाळण्यासाठी तिथून दूर जा.''

South China Sea
China Taiwan Tension: 20 चिनी विमाने अन् ड्रोनची तैवानच्या सीमेत घुसखोरी, ड्रॅगनच्या मनात आहे तरी काय?

'पुन्हा पुन्हा इशारा दिला'

यावर फिलिपाइन्स कोस्ट गार्डने उत्तर दिले की, या क्षेत्रावर त्यांचा अधिकार आहे. दुसरीकडे, अमेरिकेने पुन्हा एकदा इशारा दिला की, आम्ही फिलिपाइन्सच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहोत.

दरम्यान, अमेरिका चीनला धमकी देत ​​असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. प्रादेशिक सीमा वादात अमेरिकेने हस्तक्षेप करु नये, असा इशारा चीनने वारंवार दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com