US Travel Ban: अमेरिकेत प्रवेशबंदी! डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा आदेश, 'या' देशांवरती निर्बंध; राष्ट्रीय सुरक्षेचे कारण केले पुढे

Donald Trump Travel Ban: राष्ट्रीय सुरक्षेसाठी या देशातील नागरिकांवर बंदी घालण्यात येत असल्याचे अध्‌यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Donald Trump Us Travel Ban
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

वॉशिंग्टन: अंदाजे डझनभर देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. अफगाणिस्तान, बर्मा, काँगो, चाड, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या देशातील नागरिकांना येत्या सोमवारपासून अमेरिकेत प्रवेशबंदी असेल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले.

बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लियोन, टोगो, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला या देशातील नागरिकांवरही अधिक कठोर निर्बंध असतील, असे सांगण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी या देशातील नागरिकांवर बंदी घालण्यात येत असल्याचे अध्‌यक्षट्रम्प यांनी म्हटले आहे.

Donald Trump Us Travel Ban
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प Apple CEO टिम कुक यांना सांगतायेत, 'भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही'

ही यादी २० जानेवारीला ट्रम्प यांनी जारी केलेल्या कार्यकारी आदेशानंतर तयार करण्यात आली आहे. या आदेशानुसार, परराष्ट्र विभाग, गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक यांनी अमेरिकेविषयी शत्रुत्वाची भावना असलेल्या देशांचा अहवाल तयार करावा.

Donald Trump Us Travel Ban
Trump Tariff: धोक्याची घंटा! ट्रम्प 'टॅरिफ' धोरणांमुळे जागतिक मंदी येण्याची 60 टक्के शक्यता; जेपी मॉर्गनचा इशारा

तसेच त्या देशांतून येणाऱ्या व्यक्तींच्या प्रवेशामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो का हे ठरवावे, असा आदेश होता. पहिल्या कार्यकाळात, जानेवारी २०१७ मध्ये ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश जारी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com