धक्कादायक! बर्गर खात बसलेल्या अमेरिकन मुलावर पोलिसाने झाडल्या गोळ्या, Video Viral

America Crime: अमेरिकेत मागील महिन्यांपासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
American Boy
American BoyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

America Crime News: अमेरिकेत मागील महिन्यांपासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातच आता टेक्सासमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी आपल्या कारमध्ये बर्गर खात बसलेल्या एका किशोरवयीन मुलावर गोळ्या झाडल्याबद्दल बडतर्फ करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. सॅन अँटोनियोचे पोलीस अधिकारी जेम्स ब्रेनंड यांनी 17 वर्षीय एरिक कॅंटूवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या किशोरवयीन मुलावर सुरुवातीला पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांकडून (Police) बॉडी-कॅम फुटेज प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावरील आरोप फेटाळण्यात आले, अशी माहिती यूएस मीडियाने दिली. ही धक्कादायक घटना 2 ऑक्टोबर रोजी घडली होती.

American Boy
America Firing: मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्ये बेशुट गोळीबार, महापौरांसह 18 जण ठार

दुसरीकडे, पोलिस प्रशिक्षण कमांडर अ‍ॅलिसा कॅम्पोस यांनी एक व्हिडिओ जारी करत या घटनाक्रमाची माहिती दिली. तर टेक्सासच्या (Texas) एका फिर्यादीने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले की, 'किशोरवयीन मुलावर आरोप दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले आले नाहीत.'

American Boy
America: कॅलिफोर्नियात भारतीय वंशाच्या चार जणांचे अपहरण

"सॅन अँटोनियोच्या पोलिस अधिकाऱ्याने रविवारी निशस्त्र युवकावर गोळीबार केला. आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्याच्या आधारे एरिक कॅंटूवरील आरोप फेटाळण्यात आले," असे बेक्सार काउंटीचे जिल्हा वकील जो गोन्झालेस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com